नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार 29 ऑक्टोंबर रोजी नंदूरबार पालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत दौरा प्राप्त न झाल्याने त्यांचे येणे अनिश्चित मानण्यात येत आहे.
नंदूरबार पालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी भली मोठी पत्रिका छापण्यात आली आहे.अनेक मान्यवरांची नावे आहेत.यात कोण उपस्थित राहतात या कडे लक्ष लागून आहे.
आतापर्यंत मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , कृषी मंत्री दादासाहेब भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा शासकीय दौरा प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे.मात्र कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत दौरा प्राप्त न झाल्याने त्यांचे येणे अनिश्चित मानण्यात येत आहे.








