नंदुरबार । प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील तमायचेकर दांप्त्याने आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस रक्तदान करून साजरा केला .यात विषेश बाब म्हणजे यावेळी कुटुंबातील सहा जणांनी यावेळी रक्तदान करीत आदर्शवत काम केले आहे.
नंदुरबार शहरातील कंजरवाड्यातील रायलाल नगर येथे राहणारे डॉ.राज तमायचेकर यांचा मुलगा राम याचा पहिला वाढदिवस होतो.त्याचा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करीत तमायचेकर कुटुंबाने रक्तदान करून पहिला वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले.
त्यानुसार नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात जात वडील डॉ.राज तमायचेकर , आई स्नेहा तमायचेकर, आजोबा राकेश बच्चु तमायचेकर, आजी सुनिता राकेश तमायचेकर, काका सागर राकेश तमायचेकर, काका लक्ष्मण राकेश तमायचेकर अशा सहा जणांनी पहिला वाढदिवस रक्तदान करून साजरा केला. त्यांच्या उप्कक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.








