नंदुरबार l
शहादा येथून दोन व सोरापाडा व रतनपाडा येथून प्रत्येकी दोन अशा चार दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुकयातील असलोद येथील दरबारसिंग सरदारसिंग गिरासे यांच्या मालकीच्या दोन दुचाकी (क्र.एम.एच.३९ एएफ ७०१८), (क्र.एच.एच.१९ डीई ६८६४) शहादा शहरातील कोर्टासमोरील आवारातून चोरट्यांनी चोरुन नेल्या.
तर तळोदा तालुक्यातील रतनपाडा येथील राजेश भिमसिंग वळवी यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.१८ एई ४०१४) घरासमोरील अंगणातून चोरट्याने चोरुन नेली. तसेच अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील मोग्या सुंदऱ्या वसावे यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एजी ५८४१) घरासमोरील अंगणातून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.








