Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जि. प. च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी काँग्रेसने सदस्यांना बजावला व्हीप

team by team
October 15, 2022
in राष्ट्रीय
0
नंदूरबार जि. प. च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी काँग्रेसने सदस्यांना बजावला व्हीप
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी 17 ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे. शहादा व तळोदा पंचायत समितीच्या सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फटका बसला होता.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दगा फटका बसू नये यासाठी काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद सदस्यांना काँग्रेस चे गटनेते सी.के.पाडवी यांनी पक्ष आदेश (व्हीप ) बजावला आहे.
या आदेशात म्हटले आहे की, आपणास या पक्ष आदेशाने कळविण्यात येते की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य समिती (गट) गठीत असून त्या समितीची नियमावली आपल्या सर्वांना बंधनकारक आहे. आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य आहात.
त्या मुळे आपल्यावर या समितीचा व नियमावलीचा आदेश बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने आपणास ज्ञात आहे की, ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार -अ दि. 15 जूलै 2022 आदेशान्वये तसेच ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्यसचिव यांचा आदेश दि. 15 जूलै 2022 यांचे मुदत वाढीचे आदेश / पत्रान्वये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाकरीतेचा मुदत वाढीचा कालावधी संपण्यात आला असून ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ दि.30 सप्टेंबर 2022 अधिसुचना अन्वये जिल्हा परिषद नंदुरबारच्या अध्यक्ष पदाचा आरक्षणाच्या पदाकरीता आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.
त्याअनुषंगाने जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीकरीता विशेष सभेचे आयोजन 03/10/2022 पत्रा अन्वये आदेशित आहे. तरी उर्वरीत कालावधीसाठी सन्मानिय जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष, विषय समिती सभापती याची निवड कामी आपले पिठासीन अधिकारी, नंदुरबार याचा कडील पत्र क्र. जा.क्र.ग्रा.प. वि/निपपस/कावि/ 781/ 2022 जि.काँ. नंदुरबार दि.06/10/2022 अन्वये जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होणे कामी निवड प्रक्रिया दि. 17/10/2022 वार सोमवार रोजी दु. 11 वाजता जिल्हा परिषद सभागृह, नंदुरबार येथे घेण्यात येणार आहे. तरी आपण दि. 17/10/2022 रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवड प्रक्रियेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने नंदुरबार जिल्हा परिषद गट नेता निवडणूकी पूर्वी आदेशीत करतील त्या उमेदवारास अध्यक्ष, उपाध्यक्ष विषय समिती सभापती पदासाठी मतदान करणे आपल्यावर बंधनकारक आहे.
सदर दिवशी आपण न चुकता वेळेवर बैठकीस उपस्थित रहावे व पक्ष आदेश पाळावा. जर आपण पक्ष आदेश प्रमाणे न वागल्यास आपणा विरुध्द महाराष्ट्र लोकल बॉडी डिस क्वॉलीफीकेशन ॲक्ट व रुल्स अन्वये मधील तरतूदी नुसार कार्यवाहीस पात्र राहतील, (स्थानिक स्वराज्य संस्था सदस्या अपात्रता अधिनियम व त्यातील नियम) नुसार आपले विरुध्द कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच विषय समिती सभापती याची निवडकामी देखील हा पक्ष आदेश लागू राहील. कामी सर्वांनी पक्ष आदेश (व्हीप) पाळावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

पीडीतेच्या परिवाराला आ. आमश्या पाडवी यांची भेट, दोषींवर कारवाईसह मदत मिळवून देण्याच्या दिले आश्वासन

Next Post

शहादा शहरातील ट्रॅक्टरचे शोरुम फोडले

Next Post
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

शहादा शहरातील ट्रॅक्टरचे शोरुम फोडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add