नंदुरबार | प्रतिनिधी
धडगाव येथील पोलीस ठाण्यातून विनयभंगाच्या आरोपाखाली अटकेत असलेला एक संशयित आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाला होता.यावेळी ,एकच खळबळ उडाली.मात्र, दि.१४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी फरार झालेला आरोपी दि.१५ ऑक्टोबर रोजी दुपारी बोरवन येथे आढळून आला. त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, धडगाव तालुक्यातील बीजरी येथील इंदास झुंजार पावरा याला धडगांव पोलसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली होती. त्याची आरोग्य तपासणी करण्यासाठी पोलीस ठाण्यात बसवुन ठेवले होते.धडगांव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोंबर रोजी मतदान आहे.
त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परीसरात गर्दी झाली.याचा फायदा घेत इंदास झुंजार पावरा हा पोलीस ठाण्यातुन दि.१४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी फरार झाला.धडगांव पोलीसांनी त्याचा रात्रभर शोध घेतला असता, दुसर्या दिवशी दि.१५ ऑक्टोबर रोजी दुपारी धडगांव तालुक्यातील बोरवन येथे आढळून आला. त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.यानंतर पोलीसांनी सुटकेचा निश्वास सोडला.








