Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि. प.च्या शेवटच्या स्थायी सभेला पदाधिकाऱ्यांनी दांडी

team by team
October 11, 2022
in राजकीय
0
जि. प.च्या शेवटच्या स्थायी सभेला पदाधिकाऱ्यांनी दांडी

नंदुरबार l  प्रतिनिधी

 

 

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्यामधील शेवटच्या स्थायी सभेला अध्यक्षांसह सभापती व सदस्य अनुपस्थित राहिल्याने स्थायी सभा रद्द  करण्यात आली. विशेष म्हणजे या सभेला पदाधिकार्‍यांपैकी उपाध्यक्ष व एक सभापती उपस्थित होते.

 

 

नंदुरबार येथील जिल्हा परिषदेत काल दि.११ ऑक्टोंबर रोजी याहामोगी सभागृहात स्थायी सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्यात अध्यक्ष व उपाध्यक्षांचे मुदत संपली असून त्यांना वाढीव कालावधी मिळाला होता.

 

 

 

त्यानंतर निवडणूक आयोगाने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी दि.१७ ऑक्टोंबर रोजी निवड करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जि.प.ची स्थायी सभेची कालची शेवटची सभा होती. यावेळी अध्यक्ष, सभापती तसेच सर्व सदस्य गैरहजर होते.

 

 

याठिकाणी फक्त उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी व शिक्षण सभापती अजीत नाईक उपस्थित होते. यामुळे स्थायी सभाच रद्द करण्यात आली. त्यानंतर या सभागृहातच ऍड.राम रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली होती.

 

 

यावेळी शिक्षण सभापती अजीत नाईक, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.

 

 

यावेळी ऍड.राम रघुवंशी यांनी सांगितले की, जुने धडगांव येथील शाळेत ८०० विद्यार्थी आहेत. मात्र तेथे शौचालय नाही. त्यामुळे त्याठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. असे सांगत नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे येणारे औषधे हे एक्सप्रायरी डेट असलेले औषधे येतात. त्यामुळे चांगला ठेकेदार नेमूण जास्त मुदत असलेले औषधे मागविण्यात यावे. अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

 

 

दरम्यान आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले की, राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्ह्यात मोठया प्रमाणावर बालकांना जंत नाशक औषध  देण्यात आले आहे. उर्वरीत बालकांना दि.१७ ऑक्टोंबर रोजी जंतनाशक औषध देण्यात येईल. सदरची आढावा बैठक अवघ्या २० मिनीटात समाप्त झाली.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील फायनान्स कंपन्यांवर कारवाई करा: भिलीस्थान लायन सेनेची मागणी

Next Post

वीज कोसळल्याने घराचे झाले नुकसान, मात्र जीवित हानी टळली

Next Post
वीज कोसळल्याने घराचे झाले नुकसान, मात्र जीवित हानी टळली

वीज कोसळल्याने घराचे झाले नुकसान, मात्र जीवित हानी टळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add