नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील ६ पंचायत समितींच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यात तळोदा, नवापूर व नंदुरबार येथील पंचायत समितीसाठी अनुसूचित जमाती महिला राखीव असून अक्कलकुवा, अक्राणी व शहादा येथे अनूसूचित जमाती सर्वसाधारण जागेसाठी राखीव आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत काल दि.९ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी श्रीमती कल्पना निळ- ठुबे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत पार पडली. यात पुर्णतः अनुसूचित क्षेत्रामध्ये अक्कलकुवा, अक्राणी या पंचायत समितींमध्ये अनुसूचित जमाती सर्वसाधारण
तर तळोदा व नंदुरबार येथे अनुसूचित जमाती महिला राखीव पदाचे आरक्षण जाहिर झाले तर अंशतः अनुसूचित क्षेत्रामधील शहादा पंचायत समितीत अनुसूचित जमाती सर्वसाधारण तर नंदुरबार पंचायत समितीत अनुसूचित जमाती महिला राखीव आहे. या सभेमध्ये अनुसूचित जमातीसाठी व अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी दि.१३ ऑक्टोंबरपासून सुरू होणार्या उर्वरीत कालावधीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आल्याची उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी दिली.








