नंदूरबार l प्रतिनिधी
आश्रम शाळेतील दोन विद्यार्थिनीचा विनयभंग शिक्षण विस्तार अधिकाऱ्याविरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा शैक्षणिक सहली दरम्यान शिक्षण विस्ताराधिकार्याने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलींचे विनयभंग केल्याप्रकरणी नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकताच शहादा तालुक्यातील एका शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या अधीक्षकेचा विनयभंग केल्याप्रकरणी नंदुरबार प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकार यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली होती.त्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शहादा येथील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे सहली दरम्यान विनभांग केला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिर व वेरूळ येथे 29 ऑक्टोबर दुपारी अकरा ते साडेबारा दरम्यान सतरा वर्षीय व पंधरा वर्षीय दोन विद्यार्थिनींचा राजेंद्र जगन्नाथ मुसळे वाणी या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी एका विद्यार्थिनीला पाठीमागून मिठी मारून तर दुसऱ्या विद्यार्थिनीला समोरून खांद्यावर हात ठेवून विनयभंग केला.
यासंदर्भात शहादा शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे वाणी यांच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडे शहादा पोलिसांनी वर्ग केला आहे.याबाबत शहादा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आल्याची आले आहेत








