नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्य शासनाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत शहरातील विविध भागातील रस्त्यांचे व ओपन स्पेसमधील विविध कामांचे भूमिपूजन आ. राजेश पाडवी यांच्याहस्ते करण्यात आले.
या विकास कामांसाठी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.त्यातून ही कामे पूर्ण होणार आहेत. शहादा शहरातील नवीन वसाहतींसह जुन्या गावात रस्त्यांच्या नवीन निर्मितीसह काँक्रिटीकरण करण्याच्या कामासाठी आ. राजेश पाडवी यांनी राज्य शासनाकडे विशेष निधीची मागणी केली होती.
याअंतर्गत राज्य शासनाने विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत 15 जून रोजी पाच कोटी रुपयांचा निधी नगरपालिका संचालनायाकडे वर्ग केला होता. मात्र राज्य शासनाने सात जुलै रोजी या विकास कामांना स्थगिती दिल्याने ही सर्व कामे रखडली होती ही विकासकामे मंजूर झाली असून त्यांना निधी उपलब्ध असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने तसेच शहरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने राज्य शासनाने या कामांवरील स्थगिती उठवून ती पूर्ण करण्यासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करीत वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याला यश आले असून, शासनाने या कामांवरील स्थगिती उठवल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार राजेश पाडवी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीदरम्यान शहरातील मतदारांना तुम्ही मला आमदार करा मी शहराचा सर्वांगीण विकास करेल असे आश्वासन दिले होते, मतदारांनी मला आमदार केले.
मात्र दुर्दैवाने गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत विकास कामांसाठी निधी मिळाला नसल्याने कामे मंजूर असूनही ती पूर्ण होत नव्हती मात्र जुलै महिन्यात ऐतिहासिक सत्तांतर झाले .भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सरकार सत्तेत आले नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शहरातील विकास कामांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी मी शासनाकडे केली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तात्काळ मंजुरी देत पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने आज या विकास कामांचे भूमिपूजन करण्याचे भाग्य लाभले आहे.
आगामी दोन महिन्यात पालिका हद्दीसह पालिका हद्दीबाहेरील नवीन वसाहतींमध्ये रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे, आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते आज गोकर्ण महादेव मंदिर, आयडीबीआय बँक समोरील, विद्या विहार कॉलनी, शिवराम मंदिर, गजानन मंदिर जवळील, कल्पतरू वाचनालय जवळील, महावीर नगर प्रकाशारोड परिसरासह विविध प्रभागातील रस्त्यांची निर्मिती व मजबुतीकरण करण्यासह दूरदर्शन कॉलनीअंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व जुने पोस्ट ऑफिस येथे रस्ता व गटर निर्माण करणाऱ्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
शहरातील सर्वच प्रभागांमध्ये विकास कामे केली जातील याचा समतोल राखण्यात आलेला आहे, याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, भाजपा लोकसभा प्रभारी राजेंद्र कुमार गावित, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सुनील पाटील, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र जमदाडे, निलेश माळी, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षल पाटील, आदिवासी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, नगरसेविका विद्या जमदाडे, शहराध्यक्ष विनोद जैन, मुख्य अधिकारी दिनेश सिनारे,
बांधकाम अभियंता महाजन, माजी जिल्हा उपाध्यक्ष दिनेश खंडेलवाल, माजी नगरसेवक अरविंद कुवर, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, ज्ञानेश्वर चौधरी, रवी जमादार, बापू पाटील, मोतीलाल जैन, ललित छाजेड, गोलू जैन, सरचिटणीस युवा मोर्चा सचिन देवरे, उपाध्यक्ष पंकज सोनार, सरचिटणीस हितेंद्र वर्मा, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रमाशंकर माळी, युवा मोर्चा शहराध्यक्ष राजीव देसाई, डॉ. विभांडीक, लव लोहार, किशोर कदम, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नंदा सोनवणे,
भावना लोहार, पाठक, प्रशांत कुलकर्णी, तेजस सोनार, रुपेश पाटील, अक्षय अमृतकर, हरीश पाटील व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आपण राज्य शासनाकडे शहरातील विकास कामांसाठी सुमारे 15 कोटी रुपयांचा निधी मागितला असून या राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे यातून शुक्रवारी पाच कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले
आगामी पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये राज्य शासनामार्फत आणखी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे शहादा पालिका हद्दीतील विकास कामांसाठी एकूण दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. तसेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून यातून पालिका हद्दीबाहेरील शहरा नजीकच्या नवीन वसाहतीतील कामांचे भूमिपूजन करण्याचा मानस आहे असे आ.राजेश पाडवी यांनी सांगितले








