नंदूरबार l प्रतिनिधी
शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची सहल घेवुन परतीच्या प्रवासात बसमध्येच रात्रीच्या वेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील एका शिक्षण विस्तार अधिकार्याने आश्रमशाळेच्या अधिक्षिका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
याप्रकरणी अधिक्षिकेच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षण विस्तार अधिकार्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकार् याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २० ऑक्टोंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहादा तालुक्यातील एका शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींची शैक्षणिक सहल वेरूळ ता. दौलताबाद येथे नेण्यात आली. शैक्षणिक सहलीत इयत्ता दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षक, शिक्षिका, अधिक्षिका अशा एकुण 360 जण एसटी महामंडळाच्या सात बसेसने सहलीसाठी केले होते.
सहलीदरम्यान आश्रमशाळेतील एक अधिक्षिका महिला व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र जगन्नाथ मुसळे हे एकाच बसमधुन प्रवास करीत होते. सहल आटोपून परतीचा प्रवासात करीत असतांना रात्रीच्या वेळी 1.30 ते 3.30 वाजेच्या दरम्यान एसटी बसमध्ये बसलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी मुसळे याने अधिक्षिका महिलेला आपल्या शेजारी आसनावर बसवुन अंगलटपणा केला.
तसेच अश्लिल वर्तन करीत सदर अधिक्षिका महिलेचा विनयभंग करण्यात आला. याबाबत पिडीत आश्रमशाळेच्या अधिक्षिका महिलेने शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र जगनाथ मुसळे याच्याविरुध्द भादंवि कलम 354 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील हे करीत होते.
याप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकारी
राजेंद्र जगनाथ मुसळे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २० ऑक्टोंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.








