Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सहलीच्या प्रवासात महिला अधिक्षिकेचा विनयभंग शिक्षण विस्तार अधिकार्‍याविरुध्द गुन्हा दाखल

team by team
October 7, 2022
in क्राईम
0
सहलीच्या प्रवासात महिला अधिक्षिकेचा विनयभंग शिक्षण विस्तार अधिकार्‍याविरुध्द गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी

शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची सहल घेवुन परतीच्या प्रवासात बसमध्येच रात्रीच्या वेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील एका शिक्षण विस्तार अधिकार्‍याने आश्रमशाळेच्या अधिक्षिका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी अधिक्षिकेच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षण विस्तार अधिकार्‍याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने प्रकल्प विभागासह शैक्षणिक गोटात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहादा तालुक्यातील एका शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींची शैक्षणिक सहल वेरूळ ता. दौलताबाद येथे नेण्यात आली. शैक्षणिक सहलीत इयत्ता दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षक, शिक्षिका, अधिक्षिका अशा एकुण 360 जण एसटी महामंडळाच्या सात बसेसने सहलीसाठी केले होते.

सहलीदरम्यान आश्रमशाळेतील एक अधिक्षिका महिला व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र जगन्नाथ मुसळे हे एकाच बसमधुन प्रवास करीत होते. सहल आटोपून परतीचा प्रवासात करीत असतांना रात्रीच्या वेळी 1.30 ते 3.30 वाजेच्या दरम्यान एसटी बसमध्ये बसलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी मुसळे याने अधिक्षिका महिलेला आपल्या शेजारी आसनावर बसवुन अंगलटपणा केला.

तसेच अश्‍लिल वर्तन करीत सदर अधिक्षिका महिलेचा विनयभंग करण्यात आला. याबाबत पिडीत आश्रमशाळेच्या अधिक्षिका महिलेने शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र जगनाथ मुसळे याच्याविरुध्द भादंवि कलम 354 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडीसाठी 13 ऑक्टोंबर रोजी विशेष सभेचे आयोजन

Next Post

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 11 पोलीस अमलदारांना पदोन्नती

Next Post
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 11 पोलीस अमलदारांना पदोन्नती

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 11 पोलीस अमलदारांना पदोन्नती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add