Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माणुसकीचा दसरा :नंदुरबार पोलीसांनी केले अपघातग्रस्तांच्या दुःखाचे सीमोल्लंघन

team by team
October 6, 2022
in क्राईम
0
माणुसकीचा दसरा :नंदुरबार पोलीसांनी केले अपघातग्रस्तांच्या दुःखाचे सीमोल्लंघन
नंदूरबार l प्रतिनिधी
  मागील आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे एका खाजगी बसने ऊसतोडणी मजूर घेऊन सांगलीकडे जाणाऱ्या आयशरला समोरुन धडक दिल्याने या अपघातात ४ महिला व २ पुरुष असे ६ मजूर जागीच ठार झाले तर १५ मजूर गंभीर जखमी झाले. पोलीसांनी बसचालकाला तात्काळ अटकसुद्धा केली. गोष्ट इथे संपत नाही.
         ऊसतोडणीचा सिझन सुरु झाला की दसऱ्याचे तोंडावर पोटाची खळगी भरण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून आदिवासी ऊसतोडणी मजूर बाया माणसे..मुले ट्रकने साखर कारखान्यांच्या पट्ट्यात स्थलांतरीत होतात.चार पाच महिने गुरासारखे ऊसतोडणीसाठी राबायचे.दसरा,दिवाळी,मकर संक्रांत हे सण ऊसाच्या शेतातच साजरे करायचे आणि मिळालेली मजुरी घेऊन गुढी पाडव्याला गावाला परतायचे.पुढचे वर्षभर पुढच्या सिझनची वाट बघत त्या मजुरीवर गुजराण करायची. अंगावर अंगभर कपडे नाहीत,पायात चप्पल नाही, शिक्षणाची तर लांबची गोष्ट.
         या भीषण अपघातात कर्ते पुरुष आणि महिला गमावलेल्या पाडळदा आणि अलखेडा या गावावर शोककळा पसरली. अशात नंदुरबारचे जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह गावात येतात.थेट झोपडीसमोर बसकन मारतात. अपघातात कुणी आई तर कुणी बाप गमावलेला असतो. डझनभर लोक कायमचे जायबंदी झालेले.त्यांच्या मजुरीवर अवलंबून असलेली अनाथ झालेली उघडी वाघडी लहान मुले तर  गांगरून गेलेली.
झोपडीतले दारिद्र्य,दुःख,दैना पाहून सारेच हेलावून जातात.यंदा इथे दसरा साजरा होणार नसतो. या आदिवासी लोकांची भाषा कुणाला समजत नाही. समजते ते फक्त त्यांच्या डोळ्यातले दुःख. पोलीस अधिक्षकांचे फर्मान सुटते. शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. भापकर हे या साऱ्यांच्या घरात २ महिन्याचा किराणा पोहोच करतात. पुन्हा फर्मान सुटते या साऱ्या मयत व जखमी लोकांच्या घरी FIR ची प्रत,PM रिपोर्ट,मृत्यू दाखला,पंचनामा, इ. कागदपत्रांची फाईल घरपोच होते.सरकारी मदत आणि विमा रक्कम मिळणेसाठी जलद हालचाल सुरु होते.
उचल म्हणून घेतलेले पैसे ठेकेदारांने परत घेऊ नये यासाठी त्याला ‘सूचना’ दिली जाते. बसमालकाला बोलावून पोलीसी भाषेत ‘समजावून’ सांगितल्याने तोही या लोकांना आर्थिक मदत करतो. अपघातग्रस्तांचे दुःख हलके केल्यांने एरव्ही कडक वाटणारे पोलीस आदिवासी पाड्यावर देवदूत भासतात. नंदूरबारचे पालकमंत्री डॅा. विजयकुमार गावित,आमदार राजेश पाडवी हे सुद्धा मुख्यमंत्री फंडातून तातडीने मदत मिळणेसाठी पुढाकार घेतात.
       नंदुरबार पोलीसांनी मात्र अपघातग्रस्त आदिवासी मजुरांच्या दुःखाचे असे आगळे वेगळे सीमोल्लंघन करुन ‘माणुसकीचा दसरा’ साजरा केल्यांने त्यांचे कौतुक होत आहे.आदिवासींनीही त्यांच्या भाषेत पोलीसांचे आभार मानले आहेत.दोघांनाही एकमेकांची भाषा समजली नसली तरी परस्परांच्या भावना मात्र नक्कीच कळाल्या असतील.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार तालुक्यात वीज पडून युवकाचा मृत्यू

Next Post

श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे जळगाव येथे ७ ते ९ ऑक्टोबरदरम्या विभागीय कृषि महोत्सव

Next Post
श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे जळगाव येथे ७ ते ९ ऑक्टोबरदरम्या विभागीय कृषि महोत्सव

श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे जळगाव येथे ७ ते ९ ऑक्टोबरदरम्या विभागीय कृषि महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add