नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील ढंढाणे शिवारात आज दि.६ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शेतातून परत येत असताना अंगावर वीज पडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार तालुक्यातील ढंढाणे शिवारात शेरसिंग चंदू भील हा (वय 24) युवक शेतातून मजुरी करून घरी परतत असताना संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडली .त्यानंतर त्या युवकाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले.








