नंदुरबार l
नवापूर तालुयिातील दुधवे येथील पत्नीला पती व सवतीने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील दुधवे येथील सुदाम जेरमा नाईक यांनी त्यांची पहिली पत्नी मिनाक्षी सुदाम नाईक यांना विचारले की माझी दुसरी पत्नी अमृता कुठे गेली आहे.
यावर मिनाक्षी नाईक यांनी तुमची पत्नी तुमच्यासोबत गरबा खेळण्यास गेली होती, मला काय माहिती असे सांगितले. याचा राग आल्याने सुदाम नाईक याने मिनाक्षी नाईक यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच अमृता नाईक हिनेही काठीने मारहाण करीत पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत मिनाक्षी नाईक यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात सुदाम नाईक व अमृता नाईक यांच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तेरसिंग वसावे करीत आहेत.








