नंदुरबार l
नवापूर तालुक्यातील वासरवेल येथून मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील वासरवेल येथील एका अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेले.
याबाबत मुलीच्या वडीलांनी नवापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील करीत आहेत.








