नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हयातील पंचायत समित्यांचे सभापती पद अनुसूचित जमातीसाठी व अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी आरक्षण काढून निश्चित करन्यासाठी दि. 9 ऑक्टोंबर रोजी उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आवाहन केले आहे.
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासकीय अधिसुचना, क्रः जिपनि 2021/प्र.क्र.118/पंरा- 2 दि 4 ऑक्टोंबर 2022 अधिसूचना अन्वये नंदुरबार जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सभापती पदाच्या आरक्षणाचे वाटप उर्वरित कालावधीसाठी विनिर्दिष्ट केले आहे.
त्यानुसार पंचायत समितीच्या पुढील उर्वरित कालावधीसाठी नंदुरबार जिल्हयातील पंचायत समित्यांचे सभापती पद अनुसूचित जमातीसाठी व अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी आरक्षण काढून निश्चित करावयाचे आहे. त्याकरीता दि.9 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता, बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तसेच सदर आरक्षण सोडत काढण्याकरीता श्रीमती कल्पना निळ – ठुबे, उपजिल्हाधिकारी (ससप्र), जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांना पिठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
तेंव्हा,जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सन्मानीय सदस्य, विविध पक्षाचे अध्यक्ष, तसेच नागरीकांनी सदर सभेत आरक्षण सोडतीसाठी वरील ठिकाणी व वेळी उपस्थित रहावे.असे आवाहन नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.








