नंदुरबार l
तालुक्यातील बिलाडी शेत शिवारातून चोरट्याने ट्रॅक्टरमधून दोन बॅटऱ्या चोरुन नेली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील मेघ नगरातील विलास दिगंबर चौधरी यांचे बिलाडी शिवारात सवेर्े क्र.७८/०१ शेत आहे. सदर शेत शिवारात असलेल्या ट्रॅक्टरमधून चोरट्याने १० हजार रुपये किंमतीच्या दोन बॅटऱ्या चोरुन नेल्या.
याबाबत विलास चौधरी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.मुकेश ठाकरे करीत आहेत.








