नंदुरबार l प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के.आर.पब्लिक स्कुल, ज्यु.कॉलेज नंदुरबार येथे गरबा नृत्यचे सादरीकरण संपन्न.
शनिवारी रात्री नवरात्री उत्सवानिमित्त गरबा नृत्यचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम संस्थेचे चेअरमन किशोर वाणी, सौ.उमा वाणी, चेअरमन सिध्दार्थ वाणी, सौ. केतकी वाणी, प्राचार्य डॉ.छाया शर्मा यांच्या समवेत माता अंबेची आरती संपन्न झाली. शाळेतील सर्व विद्यार्थी पालक यांनी एकत्र येऊन या सणांचा आनंद घेतला. नव-नवीन गाण्याच्या तालावर ताल देत गरबा नृत्याचा आनंद घेत होते.








