नंदुरबार l
शहरातील बादशाह नगर व धुळे चौफुली येथून दोन दुचाकी तर जगतापवाडी परिसरातून एक चारचाकी वाहन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील राहील अशरफभाई लोहीया यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एएच ५४०७) बादशहा नगरातील त्यांच्या घरासमोरील अंगणातून चोरट्याने लंपास केली. तसेच सुनिल सुभाष ईशी यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एएन ८०९६) धुळे चौफुली येथून चोरट्याने चोरुन नेली.
तर राजेंद्र नथ्थू पाटील यांच्या मालकीचे चारचाकी वाहन (क्र.एम.एच.३९ जे ५९५२) जगतापवाडी येथील त्यांच्या घराशेजारील मोकळ्या जागेतून चोरट्याने लंपास केले. याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.








