Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लाभार्थ्यांचे आहार व पोषणात सुधारणा करा: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
October 2, 2022
in राज्य
0
लाभार्थ्यांचे आहार व पोषणात सुधारणा करा: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार |  प्रतिनिधी

 

प्रथिनयुक्त व पोषक आहार महत्वाचा असुन अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांनी प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहचवून लाभार्थ्यांचे आहार व पोषणात सुधारणा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी जिल्हास्तरीय पोषण माह समारोप प्रसंगी केले.

 

 

 

जिल्हास्तरीय पोषण माह समारोपाचे कार्यक्रमाचे आयोजन लोय आश्रमशाळा, ता. जि. नंदुरबार येथे करण्यात आलेले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री उपस्थित होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभाग, नंदुरबार श्रीमती मीनल करनवाल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड आदी उपस्थित होते.

 

 

प्रमुख मान्यवरांचे स्वागत लोय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वारे सादरीकरण केले. अंगणवाडी सेविका यांनी पारंपारिक वेशभूषेमध्ये शिबली नृत्य करून उपस्थितांचे मने जिंकली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पोषण टोपली देऊन करण्यात आले. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून महिला व बालविकास विभागाने तयार केलेल्या पोषण घटाचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी केंद्र स्तर, बीट स्तर व प्रकल्प स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्पस्तरावरील सर्वोत्कृष्ट पाककृती, सर्वोत्कृष्ट रांगोळी यांची निवड करून जिल्हास्तरावरील स्पर्धेत त्यांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

 

 

त्यातून जिल्हास्तरावर प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात आली. पाककृती स्पर्धेत प्रथम क्रमांक नंदुरबार प्रकल्पाने पटकावला द्वितीय व तृतीय क्रमांकावर अनुक्रमे शहादा व म्हसावद प्रकल्पाने बाजी मारली. सर्वोत्कृष्ट रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक नंदुरबार प्रकल्पाने मिळवला तर द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे खुंटामोडी व धडगाव प्रकल्पाने मिळविला. यासोबतच सदृढ बालक व बालिका स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

 

 

 

१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी मनीषा खत्री व प्रकल्प अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रम पोषण पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रस्तरावर व प्रकल्पस्तरावर लाभार्थ्यांच्या सहभागातून प्रथिनयुक्त व पोषक पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या जिल्हास्तरावरील सर्वाधिक प्रथिनांनी युक्त व चविष्ट पाककृती बनविणार्‍या लोय (डोंगरगाव) येथील अंगणवाडी सेविका श्रीमती बबिता पाडवी यांना पोषण वीर या किताबाने गौरविण्यात आले. नवापूर प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी सादर केलेल्या पोषण फुगडीने पोषण व आहाराविषयी जनजागृती केली.

 

 

 

जिल्हास्तरीय पोषण माह समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा राठोड जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी केले. प्रास्ताविक मध्ये त्यांनी महिन्याभरात अंगणवाडी केंद्र स्तर, बीट स्तर आणि प्रकल्प स्तरावरील घेण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली. प्रकल्पस्तरावरील घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे वैशिष्ठ सांगताना शहादा प्रकल्पातील पोषण घट व पोषण नवदुर्गा या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून पोषणाबाबत जनजागृती केली तसेच म्हसावद प्रकल्पातील बालकाच्या सर्वांगीण विकासाचा वृक्ष बालकाच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक इत्यादी अंगाचा विकास करण्यासाठी पालकाची भूमिका स्पष्ठ करण्यात आली.

 

 

 

 

 

पिंपळखुटा प्रकल्पातील कंजाला या गावातील रानभाजी उत्सव पोषण जनभागीदारी स्पष्ट करत होता. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित श्रीमती मीनल करनवाल यांनी पोषण पे चर्चा या अभिनव उपक्रमाचे कौतुक करताना समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचून नंदुरबारवासीयांनी पोषण जनआंदोलन उभे करावयाचे आहे. तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांचे कौतुक करताना आता आपली जबाबदारी वाढली आहे आता आपल्याला कुटुंब म्हणून काम करावे लागेल असे मत मांडले. प्रमुख पाहुणे रघुनाथ गावडे यांनी पोषण माह हा फक्त सप्टेंबर महिन्यापर्यंतच मर्यादित न ठेवता नियमित असे कार्यक्रम आयोजित करून पोषणाबाबत लाभार्थ्यामध्ये जनजागृती करून त्यातून लोकचळवळ उभारावी असे सूचित केले.

 

 

 

 

 

 

कार्यक्रमाचे अध्यक्षा जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी बालकाच्या स्तनपानासाठी क्रॉस क्रेडल पद्धत स्वीकारल्यामुळे सदृढ बालके दिसून येत आहेत हि नक्कीच आनंदाची बाब आहे सोबतच प्रथिनयुक्त व पोषक आहाराचे महत्व विषद करून अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांनी प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहचवून लाभार्थ्यांचे आहार व पोषणात सुधारणा करण्याचे आवाहन केले.

 

 

उपरोक्त पोषण माह समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल शिंदे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांनी परिश्रम घेतले

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यभरात “हॅलो नव्हे – वंदे मातरम्”

Next Post

जुनी पेन्शन साठी एन-मुक्ता प्राध्यापक संघटनेचे निवेदन

Next Post
जुनी पेन्शन साठी एन-मुक्ता प्राध्यापक संघटनेचे निवेदन

जुनी पेन्शन साठी एन-मुक्ता प्राध्यापक संघटनेचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add