Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथून मजूरांना घेवून जाणार्‍या आयशर व लक्झरी यांच्यात भीषण अपघात, पाच ठार, सतरा जखमी

team by team
September 30, 2022
in क्राईम
0
शहादा येथे ट्रॅव्हल्स व आयशरची भीषण धडक,अपघातात तीन जण ठार 17 जण जखमी

नंदूरबार  l  प्रतिनिधी 

 

मजुरांना रोजगारासाठी घेऊन जाणार्‍या आयशर ट्रक व लक्झरी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार तर १७ हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास शहादा बायपास रस्त्यावर नवीन बस स्थानकालगत घडली. ठार झालेल्यांमध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. घटनेतील  सहा जखमींना नंदुरबार  येथील जिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय एका गंभीर जखमी झालेल्या बालिकेला शहादा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. या अपघातात तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

शहादा तालुक्यातून रोजगारसाठी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. आजदेखील पाडळदा व अलखेड येथून पुणे येथे मजुरांना घेऊन जाणारा आयशर ट्रक (क्रमांक एम.एच.१८ एए -९८५३) व शेल्टी, शिरूड, कवळीथ, टेंभा गावातून मजुरांना गुजरात राज्यातील सौराष्ट्र येथे घेऊन जाणारी लक्झरी (क्रमांक जीजे ०३ एएक्स०१९८) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. शहादा शहराबाहेरून जाणार्‍या बायपास रस्त्यावर नवीन बस स्थानकालगत हा अपघात झाला. त्यावेळी परिसरात प्रचंड मोठा आवाज झाल्याने मदतीसाठी अनेक जण धावून आले.

 

 

अपघातात आयशर ट्रकमधील मजूर लांब अंतरापर्यंत फेकले जाऊन अनेक जण गंभीर जखमी झाले तर चार जण  ठार झालेत. त्यात तीन महिला व एक पुरुषाचा समावेश आहे. जखमींमध्ये पाच जणांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. तर पाच वर्षीय अति गंभीर बालिका शहादा येथील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या बालिकेची आई अपघातात मयत झाली आहे.

 

 

अपघातातील मयत
प्रमिला  किशोर  भिल (पवार)(वय २८, रा. पाडळदा), करण अशोक पाडवी (वय २६, रा. पाडळदा), सूनतीबाई अशोक पाडवी (वय ४५, रा.पाडळदा), रमणबाई अखेराज भिल (वय ५०, रा.अलखेड) हे ठार झाले तर उर्मिला किशोर भिल ही पाच वर्षीय मुलगी शहरातील एका खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तिची आई प्रमिला  भिल  या अपघातात ठार झाली आहे. लक्झरी चालक रहिम गोगानी (४५, रा.जुनागड गुजरात) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

अपघातात दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाली आहेत. घटनास्थळी मजुरांचे साहित्य व धान्य सर्वत्र विखुरलेले होते. अपघातात नेमके किती जण जखमी झाले आहेत, याबाबत उशिरापर्यंत पोलीस नोंद घेण्याचे काम करीत होते. अनेक हात मदतीसाठी पुढे सरसावले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील  यांनी धाव घेत मदतकार्य राबविले. भाजपाचे मकरंद पाटील, विनोद जैन, पंकज सोनार, जि.प.सदस्य हेमलता शितोळे, मोहन शेवाळे, राष्ट्रवादीचे सुरेंद्र कुवर, आ.पाडवी यांचे स्वीय सहाय्यक हेमराज पवार यांनीही मदतकार्यात सहकार्य केले. म्हसावद ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा मयतांवर शवविच्छेदन करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहरी भागात स्मार्ट मीटर बसवावेत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

उत्पन्नात वाढ झाल्यामुळे रेशन धान्य सवलत बंद करण्यासाठी दोन जणांनी केली मागणी

Next Post
उत्पन्नात वाढ झाल्यामुळे रेशन धान्य सवलत बंद करण्यासाठी दोन जणांनी केली मागणी

उत्पन्नात वाढ झाल्यामुळे रेशन धान्य सवलत बंद करण्यासाठी दोन जणांनी केली मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add