Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दणका

team by team
September 27, 2022
in क्राईम
0
गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दणका

नंदूरबार l प्रतिनिधी

 

गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दणका दिला असून याप्रकरणी 21 युवकांवर गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करुन मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकांना संबंधीत पोलीस ठाण्याला आणून सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आले आहे .

 

 

दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर रोजी दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे . नवरौत्सवाच्या अनुषंगाने मंदिर व यात्रौत्सव दरम्यान गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड काढण्याचे प्रकार काही टवाळखोर युवकांकडून होत असतात त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुद्ध पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस अधिकारी व महिला अमंलदार यांचे एक दामिनी पथक तयार करुन टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुध्द् कारवाई करणेबाबतचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते .

 

 

त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार शहर पोलीस ठाणे -14 , अक्कलकुवा पोलीस ठाणे – 2 व दामिनी पथक -5 असे एकुण 21 युवकांवर गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करुन मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकांना संबंधीत पोलीस ठाण्याला आणून सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आले आहे . तसेच सदर युवकांनी यापुढे अशा प्रकारचे कृत्य केले तर त्यांच्या पालकांना संबंधीत पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना त्यांच्या पाल्याच्या कृत्याबद्दल समज देऊन त्यांच्या ताब्यात देण्यात येईल .

 

तसेच पुन्हा त्या युवकांनी तिसऱ्या वेळेस देखील अशा प्रकारचे कृत्य केले तर त्याचेविरुध्द् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल . नवरात्रौत्सवा दरम्यान जिल्हयातील वेगवेगळया सार्वजनिक ठिकाणी गरब्याचे आयोजन केले जात असून त्या ठिकाणी असणाऱ्या टवाळखोर युवकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली असून अशा टवाळखोर युवकांविरुध्द कारवाई करणेबाबतचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत .

 

 

 

सदरची मोहिम नवरात्रौत्सवा दरम्यान अजून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे . त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्ये करण्यापासून त्यांना परावृत्त करावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दल व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी सर्व पालकांना केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

बोरद येथे महिलेसह मारहाण

Next Post

जिल्ह्यातील २०६ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंचांसाठी १ हजार ३२१ तर सदस्यपदासाठी पाच हजार २७५ नामांकने दाखल

Next Post
जिल्ह्यातील २०६ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त  सरपंचांसाठी १ हजार ३२१ तर सदस्यपदासाठी पाच हजार २७५ नामांकने दाखल

जिल्ह्यातील २०६ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंचांसाठी १ हजार ३२१ तर सदस्यपदासाठी पाच हजार २७५ नामांकने दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add