नंदुरबार l

नवापूर शहरातील लिलावती मॉलजवळ असलेले गोडावून फोडून चोरट्यांनी ए.सी., पंखा असे सुमारे ५४ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेल्याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवपाूर येथील खलफान रहेमान शेख यांच्या मालकीचे लिलावती मॉलजवळ गोडावून आहे. सदर गोडावूनचे सिमेंटचे पत्रे जुनेद फारुख काथावाला (रा.सरदार चौक, नंदुरबार) व सुभाष दगडू गायकवाड (रा.नवापूर) यांनी तोडून आत प्रवेश केला.
यावेळी गोडावूनमध्ये असलेला ३० हजार ५०० रुपये किंमतीचा ए.सी., ९ हजार ६५० रुपये किंमतीचे सात सिलिंग व एक टेबल फॅन व २ हजार रुपये किंमतीचे एक पॉवर मशिन असे एकूण ४१ हजार ७६० रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले.
याबाबत खलफान रहेमान शेख यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात भादंवि कलम ३८०, ४५७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.दादाभाऊ वाघ करीत आहेत.









