नंदुरबार l

तालुक्यातील शिंदे ते खोडसगाव रस्त्यावर दुचाकीने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील तुकाराम नंदु पाडवी हे शिंदे ते खोडसगाव रस्त्याने पायी जात होते. यावेळी सरु नानू भील (रा.सरवाडा ता.निझर) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच. १८ एके २९५६) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालवून पायी चालणाऱ्या तुकाराम पाडवी यांना मागून जबर धडक दिल्याने गंभीर दुखापत झाल्याने तुकाराम पाडवी यांचा मृत्यू झाला.
याबाबत गोपाल तुकाराम पाडवी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात सरु भील याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुनिल येलवे करीत आहेत.









