नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मंदाने येथे परिसरातील अकराशे पंचवीस लाभार्थ्यांना विकास पर्व प्रधानमंत्री उज्वला-२ योजनेअंतर्गत गॅस शेगडी वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी खा.डॉ.हिना गावित म्हणाल्या की, शासनाच्या विविध योजना तळागाळातील महिलापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच महत्त्वकांक्षी उज्ज्वला योजना २ ही बंद पडलेली पुन्हा सुरू करून चुलीवर स्वयंपाक करायला महिलांना घरधुरमुक्त व्हावे यासाठी प्रयत्न आहे व उर्वरित महिलांनी डिसेंबर अखेर पर्यंत गॅस जोडणी योजना सुरू राहणार आहे
.बचत गटातून माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून महिला सक्षम व्हाव्यात यासाठी महिला बचत गटांना वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी ट्रेनिंग देण्यात येईल तसेच वेगवेगळ्या वस्तू तयार करून त्या मेट्रो सिटीमध्ये विक्री करून महिला सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून जिल्ह्यातील महिला सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्रातून योजना आणत तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवणार असे प्रतिपादन खासदार डॉ.हिना गावित यांनी केले.
शहादा तालुक्यातील मंदाने येथे परिसरातील अकराशे पंचवीस लाभार्थ्यांना विकास पर्व प्रधानमंत्री उज्वला-२ योजनेअंतर्गत गॅस शेगडी वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ खासदार डॉ हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला शहादा नगरपालिकेचे गटनेते मकरंद पाटील, भाजपाचे डॉ.कांतीलाल टाटीया, जिल्हा परिषदेच्या सदस्या मंगलाबाई जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पूनम भामरे, नवनिर्वाचित सरपंच सुशीला भील, सोनवद सरपंच राजेंद्र वाघ, सामाजिक कार्यकर्ते रमाशंकर माळी, शरद साळुंखे, विश्वासराव पवार, ओंकार पवार, नारायण पवार, रावाबिल धरमसिंग पावरा, कमलबाई भिल, इंदुबाई भील, सविता बिरारी, सरलाबाई भिल, इंदुबाई देवरे, मंगलाबाई सैंदाणे, केदार गिरासे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.कांतीलाल टाटीया म्हणाले की, केंद्र शासना कडून वेगवेगळ्या योजना खासदार हिना गावित यांच्या माध्यमातुन घरोघरी स्वयंपाकासाठी गॅस शेगडी पोचवण्याचे कार्य सुरू आहे आतापर्यंत दीड लाख पेक्षा जास्त लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन मिळाले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक मंदाने येथील माजी उपसरपंच तथा गॅस एजन्सी संचालक अनिल भामरे म्हणाले, राजकीय विरोधकांनी केंद्राच्या अनेक विकासाच्या योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला मात्र यशस्वी झाल्या नाहीत.जिल्ह्यातील महिला सक्षम व्हाव्यात यासाठी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येणार आहे.
बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि सन्मानासाठी शासनाने अनेक योजना आहेत त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न गावित परिवाराकडून सातत्याने होत आहे कार्यक्रम मंदाने सह परिसरातील अकराशे पंचवीस लाभार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदाने येथील युवा मंच व गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.









