Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भांगरापाणी येथे गट स्तरीय क्रिडा स्पर्धेची उत्साहात सांगता

team by team
September 25, 2022
in शैक्षणिक
0
भांगरापाणी येथे गट स्तरीय क्रिडा स्पर्धेची उत्साहात सांगता
     अक्कलकुवा  l
भांगरापाणी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत गट स्तरीय  क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या.
     अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय व अनुदानित वीस  आश्रमशाळेच्या सातशेहुन अधिक विद्यार्थ्यांनी सांघिक व  वैयक्तीक क्रिडा प्रकारात सहभाग नोंदवला होता.  २० व  २१ सप्टेंबर   रोजी मुलांच्या तर २२ व २३ सप्टेंबर रोजी मुलींच्या  क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या गट स्तरीय क्रिडा स्पर्धाचे उद्घाटन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे  प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या हस्ते करण्यात आले होते .
चार दिवस चाललेल्या गट स्तरीय क्रिडा स्पर्धात चौदा, सतरा व एकोणविस असे तीन गट तयार करून सांघिक खेळात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल व रिले तर वैयक्तिक खेळ प्रकारात थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, लांबऊडी, उंचऊडी, धावणे, चालणे अशा स्पर्धांचा समावेश होता.समारोप एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा येथील शिक्षण विस्तार अधिकारी बी.आर.मुगळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या प्रसंगी भांगरापाणी शाळेचे मुख्याध्यापक एम. एन. तडवी यांनी सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचा व क्रिडा शिक्षकांचा शाल,पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार केला.
 बी.आर.मुगळे, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून दिले. व अभ्यासा बरोबर मैदानी  खेळ किती महत्वाचे आहेत याची विद्यार्थ्यांना जाणिव करुन दिली . तसेच या  क्रिडा स्पर्धेच्या समारोपा प्रसंगी व्यासपीठावर
के.आर.पाडवी (आदिवासी विकास निरीक्षक,तळोदा), भांगरापाणीचे पोलीस पाटील विनोद वसावे ,.जे.टि.वळवी,  के.पी.अलकारी,ए. बी. नगराळे ,
एस.सी.जगदाळे ,  बी.के.महिरे , ए.बी.चव्हाण,  एस.एस.राठोड, व्ही.व्ही. नाईक ,  एम. बी. गिरासे उपस्थित होते.
  या क्रिडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यातील अध्यक्ष, सदस्य तसेच सर्व शिक्षक , प्रमुख पंच, पंच, सहाय्यक पंच, गुण लेखक, टाइम किपर सर्व सहभागी शाळेचे क्रिडा शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, भांगरापाणी शाळेचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  एस.एस.अलकारी यांनी केले तर प्रास्ताविक संजय अहिरे यांनी मांडले व  आभार शाळेचे मुख्याध्यापक  एम. एन. तडवी  यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वच्छतादूत म्हणून काम केले पाहिजे- रघुनाथ गावडे

Next Post

पोलिस अधिकारी निलंबित झाल्याने पिडीत मुलीच्या पित्याने व्यक्त केले समाधान

Next Post
धक्कादायक घटना : मुलीचा मृतदेह तब्बल ४२ दिवस राखून ठेवला मिठात

पोलिस अधिकारी निलंबित झाल्याने पिडीत मुलीच्या पित्याने व्यक्त केले समाधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add