धडगाव l
कुटुंब नियोजन कार्यक्रम अंतर्गत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरास अतिदुर्गम धडगाव तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापावेतो 671 नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव हा अतिदुर्गम, डोंगर पर्वतरांगांनी वेढलेला भाग आहे. आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आरोग्य अधिकारी, कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका यांनी केलेल्या जनजागृतीमुळे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यास पुरुषांना मोठ्या प्रमाणात प्रवृत्त करण्यात आले. या जनजागृतीचा चांगला परिणाम दिसून आला असून 671 पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करण्यास पसंती देवून करुन घेतल्या आहेत. यामध्ये नर्मदा काठावरील नागरिकांचा सुध्दा सहभाग आहे.
धडगाव तालुक्यातील प्रा.आ.केंद्र काकडदा 82, बिलगाव 109, झापी 09, चुलवड 172, तलई 107, मांडवी व राजबर्डी प्रत्येकी 96 अश्या एकूण 671 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रियेसाठी तज्ञ सर्जन डॉ.जर्मनसिंग पाडवी, डॉ.संतोष परमार, डॉ.योगेश वळवी 7 शिबिरातुन 671 पुरुषांना संरक्षित केले आहे. विशेष म्हणजे ज्या भागात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केल्या जात नव्हत्या अश्या अतिदुर्गम झापी परिसरात सुध्दा आता नसबंदी शस्त्रक्रिया करुन घेण्यास स्वतःहून पुढे येत आहेत.
नसबंदी शस्त्रक्रियांमुळे कुपोषण कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिसेफचे डॉ.नागेश गाडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, डॉ.सुंदर वळवी, डॉ.सुयोग वसावे, डॉ.अंबालाल वसावे, डॉ. परमानंद रावले, डॉ.विष्णू हांगे, डॉ. मनोज शेल्टे, डॉ.मोहन मुलगीर, डॉ.गोपाल बडगुजर, डॉ.अनिल वळवी, डॉ.मंगलसिंग पाडवी, आरोग्य सहाय्यक गणेश अहिरे, महेश कोळपकर, राकेश पावरा, कैलास माळी, धनराज देवरे, जगदीश परमार,
दिलीप पावरा, श्रीमती गीता वसावे, श्रीमती सुनीता वळवी, शेवंती पावरा, स्वाती गोसावी, दिपाली बडगुजर, आरती साळवे यांच्यासह आरोग्य विभागील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, आशास्वयंसेविका, गटप्रवर्तक, परिचर, वाहन चालक, स्वीपर आदि राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेवून परिश्रम घेत आहेत.