नंदुरबार l
येथील पी.के.पाटील माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा माध्य.व उच्च.माध्यमिक मुख्याध्यापक, संघाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी जाहीर झालेले गुणवंत शिक्षक पुरस्कार शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ.एम.व्ही.कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास माध्यमिक उपशिक्षणाधिकारी आर.बी.पाटील, नियोजन उपशिक्षणाधिकारी सी.डी.पाटील,नंदुरबार जिल्हा माध्य.व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील,सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, कार्याध्यक्ष कुंदन पाटील,उपाध्यक्ष निमेश सूर्यवंशी, जयदेव पाटील, कालिदास पाठक विनय गावित, नंदुरबार तालुका अध्यक्ष, कपूरचंद मराठे,नवापूर तालुका अध्यक्ष, मिलिंद वाघ,शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष डी.पी. महाले,मुख्याध्यापक संघ पदाधिकारी, अजित टवाळे डी.डी.साळुंके फय्याज खान,राकेश जोशी, विश्वनाथ चौधरी,दिनेश बिरारीस,मनोहर साळुंके,चंद्रकांत पाटील,नूतनवर्षा वळवी मुख्याध्यापक,सुरेंद्र पाटील तसेच जिल्ह्यातील मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर बंधू- भगिनी उपस्थित होते.
पुरस्कार्थीमध्ये जिल्हातील ६ मुख्याध्यापक,६ शिक्षक,३ लिपिक व ३ शिपाई यांना सन्मानित करण्यात आले. गुणवंतांमध्ये मुख्याध्यापक,जगदीश पाटील,सुनील भामरे, शेरसिंग पाडवी,डॉ.संध्या पटेल,रवींद्र पाटील, सुकलाल वळवी तसेच शिक्षकांमधून दिलीप पाडवी,पंडित बेडसे, संकेत माळी,मुंन्सी जुनेद,मिलिंद वडनगरे, डॉ,पुष्कर शास्त्री तसेच शिक्षकेतर कर्मचारी लिपिक,शरद पाटील, सय्यद इसरार अली, सुनील वायकर, शिक्षकेतर कर्मचारी, मनोहर खैरनार, लालजी वळवी,सुदाम माळी या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ.संध्या पटेल,मिलिंद वडनगरे व शरद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.शिक्षणाधिकारी डॉ. एम.व्ही.कदम यांनी आपल्या मनोगातून पुरस्काराची परंपरा यापुढे जिल्ह्याने कायम ठेवावी.
नंदुरबार दुर्गम जिल्ह्यात अनेक शाळा, मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उत्तम काम करीत आहे.त्यांचा सत्कार,सन्मान व्हावा त्यांच्या कामाची दखल शिक्षण विभागाने, मुख्याध्यापक संघाने घेऊन त्यांना गुणवंत कर्मचारी म्हणून गौरविण्यात आल्याचे समाधान व्यक्त करून यापुढेही उत्तम काम जिल्ह्यात शिक्षण विभागाचे व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली.
प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष,मुकेश पाटील सूत्रसंचलन,किरण दाभाडे तर,आभार सचिव,पुष्पेन्द्र रघुवंशी यांनी मानले.








