Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार व शहादा तालुक्यातील १३७ ग्रामपंचायतीसाठी ७८.२७ टक्के मतदान,१९ सप्टेंबर रोजी मतमोजणी

team by team
September 19, 2022
in राजकीय
0
नंदुरबार व शहादा तालुक्यातील १३७ ग्रामपंचायतीसाठी ७८.२७ टक्के मतदान,१९ सप्टेंबर रोजी मतमोजणी

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार व शहादा तालुक्यातील १३७ ग्रामपंचायतीसाठी काल दि.१८ सप्टेंबर रोजी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदारांनी मोठया उत्साहात सहभाग घेतल्याने नंदुरबार तालुक्यात ८२.०९ टक्के तर शहादा तालुक्यात ७५.३९ टक्के मतदान झाले. किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान पार पडले. उद्या दि.१९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

नंदुरबार व शहादा तालुक्यातील १४९ ग्रामपंचायतीसाठी निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघार अंतीम दिवशी अनेकांनी माघार घेतल्याने नंदुरबार  शहादा तालुक्यातील प्रत्येकी ६ ग्रामपंचायती  बिनविरोध झाल्या आहेत. यात नंदुरबार तालुक्यातील सुतारे, भवानीपाडा, देवपुर, नटावद, पथराई व वरुळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान काल दि.१८ सप्टेंबर रोजी नंदुरबार तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. सकाळीपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

नंदुरबार तालुक्यात एकूण ४७ हजार ५५ स्त्री मतदार तर ४५ हजार २७६ पुरूष मतदार असे एकूण ९२ हजार ३३१ मतदार आहे. पैकी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान १२.९५ टक्के,११.३० वाजेपर्यंत ३२.३२ टक्के, १ वाजेपर्यंत ५२.२२ टक्के, दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६५.१६ टक्के तर मतदान संपण्याचा वेळेपर्यंत ३७ हजार ८७९ स्त्री मतदार तर ३७ हजार ९२५ पुरूष मतदार असे एकूण ७५ हजार ७९४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

नंदुरबार तालुक्यात एकूण ८२.०९ इतके टक्के मतदान झाले. तर शहादा तालुक्यात ६८ ग्रामपंचायतीसाठी १ हजार ५०० उमेदवार रिंगणात असून त्यासाठी २४३ मतदान केंद्रावर १४०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. शहादा तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींसाठी ६० हजार ३६० स्त्री मतदार तर ६२ हजार २०८ पुरूष असे एकूण १ लाख २२ हजार ५१५ मतदार आपला मतदार होते.

पैकी सकाळी ७.३० ते ९.३० वाजे दरम्यान १६.२२ टक्के, ७.३० ते ११ वाजेदरम्यान ३६.३७ , दुपारी १ वाजेपर्यंत ५६.३३ टक्के, दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६४. ४७ टक्के, सकाळी ७.३० ते मतदार संपेपर्यंत ४४ हजार ६७४ स्त्री मतदार तर ४७ हजार ६८५ पुरूष मतदार असे एकूण ९२ हजार ३५९ असे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

शहादा तालुक्यात ७५. ३९ टक्के इतके मतदान झाले. नंदुरबार व शहादा  तालुक्यातील काही संवेदनशील केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान नंदुरबार येथील वखार महामंडळात तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी होईल.नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत मतदान सुरू होते. रात्री उशिरापर्यंत कर्मचार्‍यांनी व वखार महामंडळात मतदान साहित्य जमा केले.

बातमी शेअर करा
Previous Post

जबरीने मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, ५ गुन्हे उघड करीत, दिड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

हत्याराचा धाक दाखवून सुवर्ण व्यापार्‍यास लुटणार्‍या गुन्ह्यातील एकाला गुजरात राज्यातुन अटक

Next Post
हत्याराचा धाक दाखवून सुवर्ण व्यापार्‍यास लुटणार्‍या गुन्ह्यातील एकाला गुजरात राज्यातुन अटक

हत्याराचा धाक दाखवून सुवर्ण व्यापार्‍यास लुटणार्‍या गुन्ह्यातील एकाला गुजरात राज्यातुन अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add