Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान

team by team
September 17, 2022
in राजकीय
0
नंदूरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदूरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या दि. १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार असुन त्यासाठी काल १ हजार ३१४ कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले. सहा सरपंच बिनविरोध झाले असून ६१५ जागांसाठी ११८६ तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी २१९ जण रिंगणात आहेत.

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी ६९ जागांसाठी २१९ जण तर ६१५ सदस्य पदांच्या जागांसाठी १ हजार १८६ उमेदवार रिंगणात आहेत.उद्या दि.१८ सप्टेंबर रोजी ७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असुन त्यासाठी २१९ केंद्रांची निमिर्ती करण्यात आली आहे.

 

 

नंदुरबार येथील वखार महामंडळ येथे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी कर्मचार्‍याना मार्गदर्शन केले.त्या ठिकाणी साहित्याचे वाटप करण्यात आले केंद्र अध्यक्ष,मतदार अधिकारी १,२,३, पोलीस शिपाई, १ होमगार्ड असे प्रत्येक मतदान केंद्रांसाठी ६ कर्मचारी असे एकुन १ हजार ३१४ कर्मचारी मजदान साहित्यासह २१९ मतदान केंद्रांवर रवाना झाले
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती माघारीअंती सहा ग्रामपंचायतींमध्ये सहा लोकनियुक्त सरपंच बिनविरोध झाले आहेत. ३२ ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी सरळ लढत रंगणार आहे.

 

 

माघारीअंती २५७ जणांनी माघार घेतल्याने ६१५ सदस्यांच्या जागांसाठी ११८६ उमेदवार रिंगणात आहेत तर ६९ सरपंचांसाठी २१९ जण रिंगणात आहेत. लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकूण ९३ जणांनी माघार घेतल्याने २१९ जण रिंगणात आहेत.

 

 

 

३२ लोकनियुक्त सरपंचांसाठी सरळ लढत
माघारीअंती सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून ३२ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी सरळ लढत रंगणार आहे.यामध्ये अजेपूर, अंबापूर, बिलाडी,आष्टे, बालआमराई, धीरजगाव, गंगापूर,घोगळगाव,पाचोराबारी, जळखे, श्रीरामपूर, शिरवाडे, ठाणेपाडा,विरचक, आर्डीतारा, धुळवद, मालपूर, निंबोणी, निमगाव,राजापूर, शेजवे, वेळावद, इंद्रीहट्टी, दहिंदुले बु, दहिंदुले खु, पिंपरी, सुंदरदे, करजकुपे, होळतर्फे हवेली, खोडसगाव, कोळदे, पळाशी,शिंदे, वाघोदा या ग्रामपंचायतींमध्ये लोकनिुयक्त सरपंच पदासाठी सरळ लढत होणार आहे.

 

 

सहा सरपंच बिनविरोध
माघारीअंती ७५ पैकी सहा ग्रामपंचायतींमधील लोकनियुक्त सरपंच बिनविरोध झाले आहेत. यात सुतारे, भवानीपाडा, देवपूर, नटावद, पथराई, वरुळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

 

 

या गावात आहेत निवडणुका
काळंबा , रनाळेखुर्द , भोणे , वाघशेपा , धीरजगाव , चाकळे , धुळवद , नळवे खुर्द , निमगाव , पावला , वेळवाद , बिलाडी , नंदपूर , लहान शहादे , आष्टे , अजेपूर , अंबापूर , बालआमराई , ढेकवद , दुधाळे , फुलसरे , घोगळगाव , हरिपूर , जळखे , खामगाव , नागसर , नांदखें , नारायणपूर , नवागाव , निंबोणी , पाचोराबारी , पिंप्री , शिरवाडे , श्रीरामपूर , सुतारे , उमज , वडझाकण , वाघाळे , विरचक , टोकरतलाव , गंगापूर , इंद्रीहट्टी , पळाशी , ठाणेपाडा , वाघोदा , वरूळ , वासदरे , दहिंदुले बुद्रुक , दहिंदुले खुर्द , होळतर्फे हवेली , खोडसगाव , कोळदे , पातोंडा , शिंदे , आर्डीतारा , भांगडा , भवाणीपाडा , देवपूर , धमडाई , गुजरभवाली , करजकुपे , कोठली , लोय , मालपूर , मंगळूर , नळवे बुद्रुक , नटावद , पथराई , राजापूर , शेजवे , शिवपूर , सुंदर्दे , उमर्दे बुद्रुक , वसलाई , व्याहूर या गावांचा समावेश आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपातर्फे सेवा सप्ताह पंधरवाडा अंतर्गत बस स्थानक येथे केली स्वच्छता

Next Post

नवापूरातून चंदनाची झाडे चोरी

Next Post
महिलेच्या अंगावर टरपेंटाईन फेकले, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नवापूरातून चंदनाची झाडे चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add