Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर तालुक्यात शिवसेना २५ ग्रामपंचायत निवडणूक लढवणार : आ. आमश्या पाडवी

team by team
September 17, 2022
in राजकीय
0
नवापूर तालुक्यात शिवसेना २५ ग्रामपंचायत निवडणूक लढवणार : आ. आमश्या पाडवी
नंदूरबार l प्रतिनिधी
 शिवसेना पक्षाचे नंदुरबार जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली नवापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना कोर कमिटीची बैठक संपन्न झाली.
नवापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजपमध्ये नाराज असलेले उत्सुक कार्यकर्ते शिवसेना कडे येण्याची शक्यता असल्याने इतर पक्षांना मोठा फटका बसणार आहे. शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे.
सातपुड्यातील दोऱ्या खोऱ्यात शिवसेना पक्ष वाढवणारे आमश्या पाडवींनी आता नवापूर तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी मोर्चा वळवला असल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. अनेक गावांमध्ये काँग्रेस पक्षात नाराज असलेले कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याने शिवसेना पक्षामधून निवडणूक लढविणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोर कमिटीत उपस्थित कार्यकर्त्यांना आमदार पाडवी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, जिल्हाप्रमुख गोटू पाटील, युवती सेना संघटक मालती वळवी, तालुका प्रमुख कल्पित नाईक, शहर प्रमुख अनिल वारुळे, तालुका संघटक देवका पाडवी, युवा सेनाउपजिल्हा अधिकारी दिनेश भोई, के. टी गावित, किसन सिरसाट उपशहर प्रमुख सचिन चौधरी, मनोज वाडीले, प्रमोद वाघ, महेद्र गावित, फिरोज कुरेशी, दिनेश खैरनार , सुनीता पाडवी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथुन बुलेट लंपास

Next Post

शासकीय आश्रम शाळेतील 32 शिक्षकांना आदर्श पुरस्कार प्रदान

Next Post
शासकीय आश्रम शाळेतील 32 शिक्षकांना आदर्श पुरस्कार प्रदान

शासकीय आश्रम शाळेतील 32 शिक्षकांना आदर्श पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add