नंदूरबार l प्रतिनिधी
हिरा प्रतिष्ठान संस्थेचे आधारस्तंभ काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त रामरक्षा स्तोत्र चे पठण करून परिवार व शैक्षणिक परिवारातर्फे औक्षण करण्यात आले .
या प्रसंगी हिरा प्रतिष्ठान संस्थेच्या संचालिका सौ. इंदुबाई चौधरी, अध्यक्ष प्रा.डॉ. रविंद्र चौधरी,भारताच्या वेलनेस ब्रँड ॲम्बेसेडर सौ.रेखा चौधरी,संस्थेच्या संचालिका सौ वंदना चौधरी,सौ अनिता चौधरी,संचालक नरेंद्र चौधरी, डॉ.सुधीर भोलाणे, बलवंत जाधव,हिरा फाउंडेशन च्या संचालिका प्रणिता चौधरी, सचिव रुपेश चौधरी , नवनियुक्त पदाधिकारी जगदीश जयस्वाल, संजय सोनी,सामाजिक कार्यकर्ते दिलीप सोनार, प्रकाश चौधरी, पुखराज जैन, चारूदत्त कळवणकर , भिका चौधरी,डॉ.विशाल चौधरी, अजिज खाटीक, युवानेतृत्व प्रथमेश चौधरी ,प्रणव चौधरी अपर्णा बिर्जे, नीलांबरी बेहेल
तसेच हिरा प्रतिष्ठान संस्थेचे प्राचार्य सुरेंद्र पाटील मुख्याध्यापक किरण त्रिवेदी,सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते केक वाटप करून गोड तोंड करण्यात आले.









