नंदुरबार l प्रतिनिधी
समस्याग्रस्त व पीडीत महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.
जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आल्याने सोमवार 19 सप्टेंबर 2022 रोजीचा महिला लोकशाही दिन होणार नाही. असे सदस्य सचिव महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रा.वा.बिरारी यांनी कळविले आहे.








