नंदुरबार l
जिल्ह्यात ठिकठिकाणाहून चोरट्यांनी चार दुचाकी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, पानसेमल येथील गणेश सुरेश मोेरे यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.पी. ४६ एमए ९३७३) नंदुरबार शहरातील बसस्थानसमोरील बालाजी कॉम्प्लेक्सजवळून चोरट्याने लंपास केली. याबाबत गणेश मोरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.अरविंद पाडवी करीत आहेत.
शहादा तालुक्यातील बामखेडा येथील जितेंद्र रतिलाल पटेल यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच. ३९ एई ६५८८) डाब गावातील दिलीप वसावे यांच्या घरासमोरुन चोरट्याने चोरुन नेली. याबाबत जितेंद्र पटेल यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.जलालोद्दीन शेख करीत आहेत.
शहादा येथील डॉ.चेतन संजय बिर्ला यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एजी ४०८७) शहादा शहरातील गुरुदत्त हाऊसिंग सोसायटीतून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत डॉ.चेतन बिर्ला यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना.किरण पावरा करीत आहेत.
तर अक्कलकुवा तालुक्यातील गोटपाडा येथील लालसिंग जालमसिंग वसावे यांच्या मालकीची दुचाकी (क्र.जी.जे.२६ क्यू ४४०४) गोटपाडा गावातील त्यांच्या घरासमोरील अंगणातून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत लालसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अंकिता बाविस्कर करीत आहेत.








