Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

क्षयरोग शोध मोहिम व कुष्ठरोग शोध अभियानाचा शुभारंभ

team by team
September 15, 2022
in राज्य
0
क्षयरोग शोध मोहिम व कुष्ठरोग शोध अभियानाचा शुभारंभ
नंदुरबार  l
नंदुरबार क्षयरोग व कुष्ठरोग विभाग यांचे वतीने संयुक्त क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरोग शोध अभियानाचा  शुभारंभ  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रघुनाथ गावडे यांचे हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी  जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा सहाय्यक संचालक, कुष्ठरोग  डॉ. अभिजित गोल्हार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.अमित पाटील, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण पथक  डॉ.शिवाजी राठोड, वैद्यकीय अधिकारी साथरोग  डॉ .नारायण बावा, जिल्हा लेखा व्यवस्थापक – धीरज गावित, जिल्हा आशा समन्वयक – प्रसाद सोनार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक  शिरीष भोजगुडे, राहुल वळवी, समुवेल मावची, गंगाराम वळवी, प्रवीण सानप, रामचंद्र बारी, महेश सोनी तसेच क्षयरोग विभाग तसेच कुष्ठरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
ही मोहीम दि.१३ सप्टेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली असून दि. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील जोखमीची लोकसंख्या राहत असलेल्या विविध भागांमधून ह्या मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून  यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या घरी येणाऱ्या पथकास सहकार्य करण्याचे आवाहन  मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., नंदुरबार यांनी केले आहे.
या अभियानाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती रथाद्वारे शहरी तसेच ग्रामीण भागातील अधिक क्षयरोग रुग्ण आढळणाऱ्या भागात तसेच वाडे, वस्त्या, डोंगरभाग, विटभट्या, ऊसतोड मजुर या भागात क्षयरोग व कुष्ठरोगाविषयी मराठी व आदिवासी बोलीभाषेतून ध्वनिक्षेपक आणि फलकाद्वारे क्षयरोग व कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक,  क्षेत्रीय कर्मचारी व पर्यवेक्षक यांनी निवड केलेल्या भागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन घरांमधील प्रत्येक व्यक्तीस क्षयरोग तसेच कुष्ठरोग याविषयी माहिती देण्यात येऊन कुटुंबातील सदस्यांपैकी ज्यांना क्षयरोग अथवा कुष्ठरोगाची लक्षणे आहेत अशा सर्व संशयीत क्षयरुग्णांचे थुंकी नमुने घेऊन त्यांना मोफत एक्सरे साठी नजीकच्या दवाखान्यात संदर्भीत करण्यात येणार आहे. तसेच कुष्ठरोगाचे संशयीत रुग्णांना देखील संदर्भीत करण्यात येणार आहे.
सदर मोहिमेमध्ये १३६२ पथकांद्वारे ३५४५०५  इतक्या घरांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येणार असून त्यामध्ये १७७२५२७  इतकी लोकसंख्या तपासणी करण्यात येणार आहे.
या तपासणीमध्ये क्षयरोग व कुष्ठरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करून संशयीत क्षयरुणांची मोफत थुंकी, मोफत एक्सरे तपासणी नजीकच्या मनपा दवाखान्यात करून निदान झालेल्या क्षयरुणांना त्वरीत मोफत औषधोपचार सुरू करण्यात येऊन निदान झालेल्या क्षयरुणांना उपचार सुरू असेपर्यंत  त्यांच्या बँक खात्यात दरमहा ५०० रु  निक्षय पोषण योजनेंतर्गत पोषण आहारासाठी शासना मार्फत देण्यात येतात.
बातमी शेअर करा
Previous Post

अष्टविनायक दर्शनासाठी नंदुरबार आगारातर्फे उद्या बस जाणार  

Next Post

सांगलीत हिंदू साधूंना मारहाण, पालघर घटनेची पुनरावृत्ती

Next Post
सांगलीत हिंदू साधूंना मारहाण, पालघर घटनेची पुनरावृत्ती

सांगलीत हिंदू साधूंना मारहाण, पालघर घटनेची पुनरावृत्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add