नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील खडक्या येथे मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या न्यायासाठी वडिलांनी ४४ दिवस मृतदेह मिठाच्या खड्ड्यात पुरून ठेवला होता पुर्न शवविच्छेदनासाठी पोहोचलेल्या पोलीस प्रशासनाला पीडित कुटुंब व गावकऱ्यांनी विरोध दर्शविला असून धडगाव स्थानिक डॉक्टरांनी पहिल्या सर्व विच्छेदनात त्रुटी ठेवल्याने त्यांच्यावर पुन्हा विश्वास कसा ठेवावा? असे सांगत कुटुंबीयांनी मृतदेहावर मुंबई येथील तज्ञांकडून शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती अखेर
४४ व्या दिवशी मृतदेह मिठाच्या खड्ड्यातून काढून मुंबई कडे शवविच्छेदनसाठी पोलीस बंदोबस्तात रुग्ण वाहिका रवाना करण्यात आला.
–
नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव तालुक्यातील खडक्या येथे मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करत मयत मुलीच्या पालकांनी तब्बल ४४ दिवसांपासून मृतदेह मिठामध्ये राखून ठेवला आहे. याबाबत मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावे तसेच जोपर्यंत संबंधीत दोषींवर कारवाई होवून मयत मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीसांनी याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच आरोग्य विभागाच्या पथकाने मयत कुटुंबाच्या मयत मुलीच्या कुटुंबियांची समजूत काढीत मृतदेहाचे पुन्हा नंदुरबार येथेच शवविच्छेदन करून योग्य तो अहवाल प्राप्त झाल्यावर दोषींवर कडक कारवाई करण्याची आश्वासन दिले होते. मात्र पोलिसांवर विश्वास न ठेवता मुलीच्या कुटुंबियांनी मुंबई येथेच मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले पाहिजे असा हट्ट धरला. आणि अखेर बुधवारी नंदुरबार जिल्हा न्यायालयाने मुलीच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन मुंबई येथील जे जे रुग्णालयात करण्याचे लेखी आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे.
यानंतर बुधवारी सायंकाळी नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाचे पथक, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा रुग्णवाहिका घेऊन बुधवारी सायंकाळी धडगाव तालुक्यातील खडक्या गावी रवाना झालेत. रात्री मयत मुलीचा मृतदेह उकरून लगेच पोलीस बंदोबस्तमध्ये रुग्णवाहिकाने मुंबईला रवाना झाले आहेत.
तर उद्या गुरुवार दि.१५ रोजी सकाळी मुंबईतील शासकीय जे जे रुग्णालयात मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊन, मुलीचा मृत्यू आत्महत्याने झाला की, मुलीवर बलात्कार झाला हे आता मुंबईत शवविच्छेदन झाल्यानंतर आलेल्या अहवालानंतरच स्पष्ट होईल.








