Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धक्कादायक घटना : मुलीचा मृतदेह तब्बल ४२ दिवस राखून ठेवला मिठात

team by team
September 13, 2022
in क्राईम
0
धक्कादायक घटना : मुलीचा मृतदेह तब्बल ४२ दिवस राखून ठेवला मिठात

नंदुरबार | प्रतिनिधी

धडगांव तालुक्यातील खडक्या येथे मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करत मयत मुलीच्या पालकांनी तब्बल ४२ दिवसांपासून मृतदेह मिठामध्ये राखून ठेवला आहे. याबाबत मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावे तसेच जोपर्यंत संबंधीत दोषींवर कारवाई होवून मयत मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, असा पवित्रा घेण्यात आल्या आहे. दरम्यान, पोलीसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगांव तालुक्यातील खडक्या येथील एका विवाहित मुलीला तालुक्यातील वावी येथील रहिवाशी व अन्य एकजण १ ऑगस्ट २०२२ ला बळजबरी गाडीवर बसवून घेवून गेला होता.

त्यानंतर सदर पिडीत विवाहितेने तिच्या नातलगांना सांगितले की, वावी येथे रणजीतसह चार जण चित्रपटाप्रमाणे कुकर्म करीत असून मला हे मारणार आहेत, असे वाटते. त्या ठिकाणचे फोटोही सदर विवाहितेने नातेवाईकांना पाठविले होते.

त्यानंतर तिचे कुटूंबिय वावी येथे गेले असता सदर विवाहित मुलगी ही आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह आंब्याच्या झाडावरून खाली उतरविला, असे तिच्या पालकांकडून सांगण्यात येत आहे.

पिडीतेवर बलात्कार झाल्याचे कुटूंबियांनी सांगूनदेखील तिच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झालेली आढळून आली नाही. आंब्याचे झाड उंच असून त्याठिकाणी ती विवाहिता कशी चढू शकते, असा प्रश्‍न कुटूंबियांनी उपस्थित केला.

याबाबत पोलीसांनी सुरुवातीला आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. तसेच वावी येथील रणजीत ठाकरेसह तिघांना अटक केली आहे. त्या मुलीचा मृतदेह कुटूंबियांकडे अंतिमसंस्कारासाठी सोपविण्यात आला होता.

मात्र मुलीच्या पित्याने जोपर्यंत पिडीतेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार करत घराशेजारच्या शेतात खड्डा करून त्या मयत विवाहितेचा मृतदेह मिठामध्ये पुरण्यात आला.

त्यानंतर कुटूंबियांसह ग्रामस्थांनी धडगांव पोलीस स्टेशनसह थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठून आपले गार्‍हाणे मांडले. त्यानंतर पोलीस अधिक्षकांनी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर पिडीत युवतीचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचा सूचना धडगांव पोलीसांना दिल्या.

 

पिडीतेच्या मृत्यूपुर्वी व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपची तपासणी करण्यात येत आहे. यात काही तथ्य आढळल्यास वाढीव कलम लावण्यात येतील. याबाबत धडगांव येथील तहसिलदारांशी याबाबत पत्र व्यवहार करण्यात आलेले आहे.

– श्रीकांत घुमरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा

 

माझ्या मुलीने गळफास घेवून आत्महत्या केलेली नसून तिच्यावर बलात्कार करण्यात आला असून त्यानंतर झाडावर लटकविण्यात आले आहे. तिला न्याय मिळविण्यासाठी तिचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावे, जोपर्यंत पुन्हा शवविच्छेदन होत नाही. तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही.

पिडीतेचे वडील

 

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबारसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका भाजपा व शिंदे गट एकत्र लढणार: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

Next Post

खर्दे खुर्दे येथे वीज पडल्याने ऐनहंगामात बैलाचा मृत्यू

Next Post
खर्दे खुर्दे येथे वीज पडल्याने ऐनहंगामात बैलाचा मृत्यू

खर्दे खुर्दे येथे वीज पडल्याने ऐनहंगामात बैलाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add