नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरासह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका यांच्यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढतील असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जेष्ठ नेते तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे आज दि.१३ रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असून
त्यांनी नंदूरबार येथील विजयपर्व येथे पत्रकार परिषदेत घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.त्यांनी सांगितले की.आगामी सर्व निवडणुका नंदूरबार जिल्ह्यासह राज्यात एकत्र लढणार आहे.
नंदूरबार पालिकेसह जिल्ह्यातील सर्व पालिका स्थानिक स्वराज्य संस्थातर्फे येणाऱ्या आगामी सर्व निवडणुका नंदूरबार जिल्ह्यातील भाजपा व शिंदे गटात गेलेले नेते यांच्याशी चर्चा करून समन्वयाने या बाबत निर्णय घेण्यात येईल. आपापसात असणारे मतभेद मिटवून एकत्र निवडणुका लढविण्यात येईल असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित, युवा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आ.राजेश पाडवी, माजी आ.शिरीष चौधरी, शशिकांत वाणी आदी उपस्थित राहणार आहेत.
भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या या विधानामुळे आता नंदूरबार पालिका बिनविरोध होणार की तिसरी आघाडी निर्माण होणार,याकडे लक्ष लागले आहे.








