नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील सी.टी.पार्क येथे ॲटोरिक्षाने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ॲटोरिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील सी.टी.पार्क येथे दशरथ लालचंद राठोड (रा.नळवे खुर्द ता.नंदुरबार) हे त्यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एएफ ७५९३) रस्त्याच्या बाजूला लावून उभे होते. यावेळी एका ॲटोरिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील ॲटोरिक्षा (क्र.एम.एच.३९ एसी ०२३१) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ॲटोरिक्षा चालवून दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात दशरथ राठोड यांना दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत दशरथ राठोड यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात ॲटोरिक्षा चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.निलेश पाटील करीत आहेत.








