नंदूरबार l प्रतिनिधी
गेल्या तीन ते चार दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढग व विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होत आहे. काल संध्याकाळच्या सुमारास नवापूर तालुक्यातील पूर्वपट्ट्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात नवापूर तालुक्यातील सोनखांब येथील रहिवासी आलू मंगल्या गावीत यांच्या बैलावर निमदर्डा शिवारात वीज पडल्याने एक बैल ठार झाला आहे. तर शेतकऱ्यालाही विजेचा धक्का बसला आहे. सदर वीज पडून अपघाताचा तलाठी महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला असून. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य ती मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात रात्रभर पावसाची रिमझिम सुरू असून सकाळी सर्वत्र धुक पसरल्याचे चित्र आहे. सदर धुक्यामुळे मानवी जीवनासह शेती पिकांवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यात पीकं कमजू लागली होती. परंतु झालेल्या पावसामुळे शेती पिकांनाही आधार मिळाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आणखी पूढील काही दिवस वादळी वाऱ्याचा पाऊस असल्याने. परतीचा पाऊस नुकसानदायक ठरतो त्यामुळे काळजी घ्यावी. विजा चमकत असताना घराबाहेर पडू नये. तसेच आपली जनावरही सुरक्षित स्थळी न्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.








