नंदुरबार l
तालुक्यातील धमडाई गावाच्या शिवारात भांडणाच्या कुरापतीतून दोन गटात वाद झाल्याने यात तिघांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील धमडाई येथील प्रविण झुलाल कोळी व झुलाल कोळी यांना भांडणाची कुरापत काढून राघव दौलत कोळी, योगेश राघव कोळी, बापू राघव कोळी यांनी काठीने व हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत कल्याण झुलाल कोळी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोहेकॉ.लता पाडवी करीत आहेत. तसेच योगश राघो मगरे यांच्या परस्पर फिर्यादीत म्हटले आहे की, मागील जुनी केस मिटून गेल्याचा वचपा काढण्यासाठी कल्याण झुलाल कोळी, प्रविण झुलाल कोळी, झुलाल दौलत कोळी, चंद्रकांत दीपक कोळी यांनी योगेश मगरे यांना काठीने व दगडाने मारहाण केली.
तसेच शिवीगाळ केली. याबाबत योगेश मगरे यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३३७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.कैलास मगरे करीत आहेत.








