नंदुरबार l
नवापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातर्फे आयोजीत बैठकीत शेकडो युवा कार्यकर्त्यांचा प्रवेश केला.यावेळी पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली.
नवापूर तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या युवक आघाडी वतीने नवापूर तालुका बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अरविंद कुवर तर प्रमुख उपस्थिती आरपीआय आठवले युवक जिल्हाप्रमुख सुभाष पानपाटील व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते चंद्रकांत भाऊ नगराळे हे उपस्थित होते.
सदर बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या दि.३ ऑक्टोंबर २०२२ रोजी जळगाव येथे संपन्न होणार्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्यासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल शिरसाट व प्रवीण तीरमल्ली यांनी यावेळी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह आर.पी.आय आठवले पक्षात जाहीर प्रवेश केला.
पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष व युवक जिल्हाप्रमुख यांच्या सूचनेनुसार राहुल शिरसाट यांची आरपीआय आठवले युवक जिल्हा कार्याध्यक्षपदी तर प्रवीण तिरमली यांची नवापूर तालुका अध्यक्षपदी यावेळी नेमणूक जाहीर करण्यात आली. सदर बैठकीस सुनील राठोड,दिनेश राठोड ,संतोष तिरमली , हेमंत सोनवणे, रवींद्र तिरमली, विजय राठोड, रोहित राठोड,अनिल राठोड, अनिल पवार, रितेश राठोड, संतोष लक्ष्मण तिरमली, नागेश राठोड , अर्जुन राठोड, भाविन राठोड, अजय राठोड, उमेश राठोड,रोहित राठोड, अंकित कोकणी,दीपक तिरमली, किरण राठोड, विजय गावित,दादू कोकणी,रुपेश गावित आदींसह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.








