नवापूर |
तालुक्यातील चरणमाळ घाटात काल दि.१० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ताराबाद वरुन खोडीयार (गुजरात) येथे जाणारी खाजगी बस तीव्र वळणावर बसचा ब्रेक न लागल्याने बस उलटली.या भिषण अपघातात चालक व १८ महिण्याच्या बालीकेचा मृत्यू झाला तर १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ताराबाद वरुन खोडीयार (गुजरात)े जाणारी खाजगी बस (जी.जे.०३,डब्ल्यु-९६२४) नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटातील तीव्र वळणावर पलटी झाली. मुसळधार पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने ही बस पलटल्याची प्राथमिक माहिती आहे.
बसमधे ३० प्रवासीप्रवास करत होते. प्रवाश्यांना काही कळायच्या आत बसचा अपघात झाल्याने एकच आक्रोश करण्यात आला. लहान मुल आणि महिलांच्या रडण्याचा आवाज ह्रदय पिळवटून टाकणारा होता. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर १०८ रुग्णवाहिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात आणले. रात्रीचा अंधार त्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने मदतकार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अपघाताची माहितीमिळताच स्थानिक नागरीक, पोलीसांनी घटनास्थळीधाव घेत मदतकार्य केले.
दरम्यान तीव्र वळणावर ब्रेक न लागल्याने बस मोठया दगडासह बस रस्त्यावर कोसळली. सर्व प्रवाशी झोपले होते. दोन १०८ रूग्णवहिका, एक खाजगी रूग्णवहिकेने जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाला जेसीबीच्या साहाय्याने तासाभरानंतर चालकाला बाहेर काढण्यात आले. सदर बस ताराबाद वरुन खोडीयार (गुजरात) जात होती.या अपघातात चालक अफजल मुसाभाई सोडा (वय३०वर्षे) रा. बिलखा जि. जुनागड, अश्विनी सुरेश माळी (वय १८ महिन) रा.निताणे ता.सटाणा जि.नाशिक या दोघांचा मृत्यू झाला तर अपघातात संगिता सुरेश माळी रा.निताणे ता.सटाणा,माधुरी जिवन माळी रा.दशवेल ता.सटाणा,
विमलबाई भिमराव पवार रा.डांगसैदाणे, ता.सटाणा, पुर्वा शरदजगताप,रा.निताणे ता.सटाणा, राजेंद्र सुनिल सोनवणे रा.अवाटी ता.सटाणा, सुरेखा जिवन माळी रा. दसवेल ता.सटाणा, अनिता उमेश गवळी रा. ताहराबाद. ता.सटाणा,सुरेखा दशरथ वाघ रा. तरसाळी. ता.सटाणा, वैशाली राजु सोनवणे रा.तरसाळी, मिना भुरा सोनवणे रा.नामपुर, संजयभाई अशोकभाई पागडा रा.सितानगर सोसायटी, सुरत, राजु मधुकर खैरनार रा.तलवाडे, महेंद्रभाई पादाभाई वाअया रा.सुरत. यांना किरकोळ दुखापत झाली असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी उमेश तुळशिराम गवळी रा.वार्शी ता, देवळा जि.नाशिक यांच्या फिर्यादिवरून नवापूर पोलीस ठाण्यात मयत चालक अफजल मुसाभाई सोडा यांच्या विरूध्द भादवि कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७ मो.वा.का.क १८४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनि निलेश वाघ करीत आहेत.








