नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील बालवीर चौक ,नवा भोईवाडा परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळतर्फे 80 व्या शहीद दिनानिमित्त हुतात्मा शिरीषकुमार आणि भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नंदुरबार तालुका निमंत्रित सदस्य संभाजी पाटील यांच्या हस्ते हुतात्मा शिरीषकुमार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेच भारत मातेच्या प्रतिमेस तेजश्री पाटील या विद्यार्थीनीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, उद्योजक रामदास जाधव, संभाजी हिरणवाळे, दीपक गोडळकर, गोपाळ हिरणवाळे, सिद्धू नागापुरे, विशाल हिरणवाळे, जी.एस.गवळी, सुनिता हिरणवाळे, विमल भोई, दिपाली गवळी, लीना हिरणवाळे, भाग्यश्री हिरणवाळे, चैताली गवळी, रोशनी झारखंडे आदी उपस्थित होते.








