नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा जांबीपाडा येथे अतिक्रमीत झोपडी व अतिक्रमण क्षेत्र सोडून देण्यास सांगितल्याच्या राग आल्याने वनरक्षकास जिवेठार मारण्याची धमकी देत मान व शर्टाची कॉलर पकडून फाडून टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा जांबीपाडा येथील बामण्या पाश्या राऊत याला वनरक्षक अंतिरसिंग बोला तडवी यांनी फॉरेस्ट शिवारातील अतिक्रमीत झोपडी व अतिक्रमीत क्षेत्र सोडून देण्यासाठी समजावित होते.
याचा राग आल्याने अंतरसिंग तडवी यांना बामण्या राऊत याने जिवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच अंतरसिंग तडवी यांची मान पकडून कॉलर पकडून शर्ट फाडला. याबाबत अंतरसिंग तडवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात बामण्या राऊत याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहााय्यक पोलिस निरीक्षक धनराज निळे करीत आहेत.








