Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कापूस खरेदीला प्रारंभी मिळाला 10,500 रुपये प्रति क्विंटल भाव

team by team
September 9, 2022
in राष्ट्रीय
0
कापूस खरेदीला प्रारंभी मिळाला 10,500 रुपये प्रति क्विंटल भाव
खेतिया l प्रतिनिधी
 येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मंसाराम जामरे, खेतिया कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष महिपाल नाहर यांच्या हस्ते पूजा अर्चना करून कापूस लीलावाचा शुभारंभ करण्यात आला.
 यावेळी मंडीच्या प्रांगणात व्यापारी, शेतकरी, हमाल, मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कापूस खरेदी सुरू होत आहे असे कळताच बाजार समितीमध्ये वाहनांची वर्दळ सुरू झाली. यामध्ये सर्वप्रथम पहिले वाहन व पहिली बोली अर्थे ता. शिरपूर येथील शेतकरी आबा पाटील यांच्या कापसाला 8005 रु प्रति क्विंटल भाव देण्यात आला आणि सदर कापूस हा मित्तल इंडस्ट्रीज ने खरेदी केला व त्यावेळी शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या कापसाला सर्वात जास्त भाव अनरद ता.शहादा येथील शेतकरी उत्तमराव पुंडलिक यांच्या कापसाला जास्तीत जास्त भाव 10 हजार 500 रुपये (10,500) रुपये प्रति क्विंटल इतका भाव देण्यात आला आणि सदर कापूस हा नाकोडा ऍग्रोटेक यांनी खरेदी केला. बाजार समितीमध्ये एकूण 20 वाहने आली होती व कापसाची आवक चांगली होती. कापसाला जास्तीत जास्त भाव 10,500 रु तर कमीत कमी 6,950 रु भाव होता. एकंदरीत शुभ मुहूर्त आवक 125 क्विंटल होती.
यावेळी बाजार समितीचे सचिव  मंसाराम जामरे, खेतिया कॉटन असोसीएशनचे अध्यक्ष महिपाल नाहर, संचेती कोटेक्सचे दिलीप संचेती, आदित्य संचेती, मित्तल ग्लोबल कॉटन कमल अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, प्रांशय अग्रवाल, नानेश इंडस्ट्रीज सुनिल जैन, आशिष जैन, गोकुळ जिनिंग प्रविण शाह, अंकित शाह, दिविल कॉटन पंकज अग्रवाल, बालाजी कॉटन गजानन मालवीय, अमित मालवीय, हितेश सुराणा, नाकोड़ा एग्रो टेक राजेश नाहर, अमित नाहर, सौरभ नाहर, गोवर्धन कोटेक्स दीपेश हरसोला, प्रितेश हरसोला, दुर्गेश्वरी जिनिंग भीकमचंद जोशी, तिवारी जी, अंकित तिवारी, सत्यम जिनिंग मुकेश टाटिया, कमलेश टाटिया, गुरुप्रसाद ट्रेडींग कंपनी आदि कॉटन व्यापारी उपस्थित होते व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यातील शेतकऱ्यांची कापूस विक्री साठी खेतिया बाज़ारपेठ विश्वासू बाजार पेठ म्हणुन प्रसिद्ध आहे.
शेतकरी वर्ग खेतिया बाजार समितीत कापूस विक्री साठी मोठ्या संख्येने येत असतात. खेतिया बाजार समितीच्या कापूस खरेदीच्या भावाकडे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष असते. यावेळी बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

वीज पडल्याने २२ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू

Next Post

शेतात रानडुकरांनी धुडगूस, पिकांची केले नुकसान

Next Post
शेतात रानडुकरांनी धुडगूस, पिकांची केले नुकसान

शेतात रानडुकरांनी धुडगूस, पिकांची केले नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add