Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात 13 सप्टेंबरपासून 17 लाख नागरिकांची करण्यात येईल तपासणी

team by team
September 8, 2022
in सामाजिक
0
जिल्ह्यात 13 सप्टेंबरपासून 17 लाख नागरिकांची करण्यात येईल तपासणी

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधण्यासाठी 13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत आरोग्य विभागाच्यावतीने संयुक्त शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे सुक्ष्म नियेाजन करुन ही मोहिम यशस्वीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्हा समन्वय समितीची बैठकीत दिल्या.

कुष्ठरोग व क्षयरोग रूग्ण शोध मोहिमेनिमित्त जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार आदी उपस्थित होते.

 

श्रीमती खत्री म्हणाल्या की, कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेवून निदान निश्चितीनंतर औषधोपचार सुरु करण्यासाठी ही शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या अभियान कालावधीत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील 3 लाख 54 हजार 505 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी 1 हजार 362 तपासणी पथक व 272 पथक पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. या पथकाद्वारे शहरी व ग्रामीण भागातील 17 लाख 72 हजार 527 इतक्या लोकसंख्येची घरोघरी जावून तपासणी करण्यात येणार आहे.

 

तपासणीत कुष्‍ठरोग व क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा शोध घेवून रोगांचे लक्षण आढळणाऱ्या संशयित रुग्णांची मोफत एक्सरे, थुंकी तपासणी जवळच्या सरकारी दवाखान्यात करुन रोगाचे निदान झाल्यास त्यांना त्वरीत मोफत औषधोपचार चालु करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर काम करणा-या आशा सेविका, क्षेत्रिय कर्मचारी, स्वयंसेवक, पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे पथक घरोघरी जावून भेटी देवून कुष्ठरोग, क्षयरोग आजाराविषयी माहिती तसेच मार्गदर्शन करणार आहेत.

 

या शोध मोहिमेत घरोघरी जावून घरातील सदस्यांची तपासणी करण्यात येईल. महिला सदस्यांची तपासणी ही आशासेविकामार्फत तर पुरुष सदस्यांची पुरुष स्वयंसेवकामार्फत करण्यात येणार असून घरातील सर्व सदस्यांची तपासणी झाल्यावर घरावर एल (L) लिहून घराचा क्रमांक व तारीख नोंदविण्यात येणार आहे. घरातील एक किंवा सर्व व्यक्तींची तपासणी करावयाची राहिली तर एचएक्स (XH), सदस्यांनी तपासणीस नकार दिल्यास एक्सआर (XR), सर्व्हेच्या वेळी गैरहजर सदस्य परत येणार नसेल तर एक्सव्ही (XV), घर कायमचे बंद असेल तर एक्सएल (XL) अशी खूणीद्वारे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येईल.

 

या मोहिमेमध्ये जनतेने सक्रिय सहभाग घेवून हे अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती. खत्री यांनी यावेळी केले. बैठकीस समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

 

क्षयरोगाची लक्षणे

क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून तो कोणालाही होऊ शकतो. क्षयरोग मुख्यत्वे फुफ्फुसांवर परिणाम करतो. दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, भूक मंदावणे, मानेवर गाठी येणे, थुंकीवाटे रक्त जाणे अशी क्षयरोगाची लक्षणे आहेत.

कुष्ठरोगाची लक्षणे

अंगावरील फिकट लालसर संवेदनारहित चट्टा, मऊ व चकाकणारी तेलकट त्वचा, अंगावर गाठी व कानाच्या पळया जाड होणे, हाता पायांमध्ये बधिरता व शारीरिक विकृती, त्वचेवर थंड व गरम संवेदना न समजणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे अशी लक्षणे आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक ३८८ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर, प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

Next Post

अभिनेता सोनू सुद बनणार चेतक फेस्टिव्हलचा ब्रॅड ॲम्बेसिडर

Next Post
अभिनेता सोनू सुद बनणार चेतक फेस्टिव्हलचा ब्रॅड ॲम्बेसिडर

अभिनेता सोनू सुद बनणार चेतक फेस्टिव्हलचा ब्रॅड ॲम्बेसिडर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add