नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे विना परवाना तलवार बाळगल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील वडखुंट येथील चौफुलीजवळ विठ्ठलसिंग फुलसिंग वसावे रा.कुंभ्याफळी चिंचपाडा ता.नवापूर याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करीत १०० रुपये किंमतीचे एक तलवार विना परवाना कब्जात बाळगतांना आढळून आला.
याबाबत पोना.जितेंद्र चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन विठ्ठलसिंग वसावे याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कल्मा ४/२५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत वळवी करीत आहेत.