नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथे गणेश विसर्जन मिरवणूकीत पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे २५ जणांविरुद्ध नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथे गणेश विसर्जन मिरवणूकीत रामदेव बाबा मंडळ, भवानी गणेश मंडळ, सरदार वल्लभभाई पटेल मंडळाचे गणेश कार्यकर्ते राजू माळी, लक्ष्मीकांत माळी, पप्पू दशरथ माळी, रावश्या माळी, रविंद्र चौधरी, गणेश पटेल, निलेश उर्फ दादू पटेल, रामेश्वर पटेल,
गोल्या राजपूत, निलेश पाटील, उमेश पाटील, कृष्णा राठोड, हिरा झामु बंजारा, राहूल आधारसिंग राजपूत तसेच गणेशमुर्ती ठेवलेले ट्रॅक्ट्रर (क्र.एम.एच.३९ एन १३२४, क्र.एम.एच.३९ एबी ०३९) तसेच एक विना नंबरचे एक ट्रक्टर मालक व इतर अशा ७ ते ८ जणांनी पोलिसांच्या आदेशाकडे दुर्ली करुन ट्रॅक्टर जागेवरच उभे करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.
याबाबत पोना.विजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात सुमारे २५ जणांविरुद्ध भादंवि कलम १८६, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकेॉ.नरेश गुरव करीत आहेत.








