Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

20 सप्टेंबर रोजी पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

team by team
September 6, 2022
in राज्य
0
20 सप्टेंबर रोजी पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
 शहादा   l
    पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री.पी.के. अण्णा पाटील फाउंडेशन शहादा जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने कै. अण्णासाहेब पी.के.पाटील स्मृती आंतर महाविद्यालयीन विभागीय पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे दि.20 सप्टेंबर रोजी  आयोजन करण्यात आले आहे.
     सहकार व शिक्षण महर्षी कै. अण्णासाहेब पी.के. पाटील यांनी संपूर्ण आयुष्य शिक्षण, सहकार व समाज सुधारणा यासाठी अर्पण केले. दि. 18 सप्टेंबर 2014 रोजी त्यांच्या देह अनंतात विलीन झाला. कै. अण्णा साहेबांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी दि. 20 सप्टेंबर मंगळवारी आंतर महाविद्यालयीन विभागीय पुरुषोत्तम वकृत्व स्पर्धेचे ऑफलाइन आयोजन करण्यात आले आहे .
नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयीन स्तरावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेसाठी अमृत महोत्सवी भारत, सहकार चळवळीचे भविष्य, गड्या आपला गाव बरा,आजची प्रासंगिक मूल्य हे चार विषय ठेवण्यात आले आहेत. विजेत्यांना प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये, द्वितीय सात हजार रुपये, तृतीय पाच हजार रुपये स्पर्धक व महाविद्यालयास विभागून दिले जाणार आहे.
तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी रुपये एक हजारचे स्पर्धकास दिले जातील. दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ होईल. उद्घाटन कार्यक्रम सकाळी नऊ वाजता मंडळाचे अध्यक्ष  दीपक पाटील व सचिव श्रीमती कमलताई पाटील यांच्या हस्ते होईल.
पारितोषिक वितरण त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी ऑनलाईन लिंक देण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी माजी प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार, उपप्राचार्य प्रा.कल्पना पटेल,प्रा. डॉ.विजयप्रकाश शर्मा,प्रा.डाॅ.तुषार पाटील,प्रा.डाॅ.चंद्रशेखर सुतार यांची संयोजन समिती नियुक्त करण्यात आली आहे.
सहभाग घेण्याचे आवाहन उपाध्यक्ष जगदीश पाटील आणि शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्यावतीने राज्यपाल यांना निवेदन

Next Post

शहादा महाविद्यालयात बॉटनी क्लबचे उदघाटन

Next Post
शहादा महाविद्यालयात बॉटनी क्लबचे उदघाटन

शहादा महाविद्यालयात बॉटनी क्लबचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add